South Africa T20 League: जगभरातील सर्वात लोकप्रिय लीग आयपीएलपूर्वी दक्षिण आफ्रिकेत मिनी आयपीएल खेळवली जाणार आहे.या स्पर्धेचं आयोजन पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यात होणार आहे. या लीगमध्ये खेळणाऱ्या 6 संघाना आयपीएल फ्रॅन्चायजींच्या मालकांनीच विकत घेतलंय, अशी माहिती समोर येतेय. प्रसार माध्यमांत झळकत असलेल्या बातमीनुसार, मुंबई इंडियन्स (Mumbai Indians), चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super King), दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals), सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad), लखनऊ सुपर जाएंट्स (Lucknow Super Giants) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांनी दक्षिण आफ्रिकेच्या टी-20 लीगमध्ये मालकी हक्क मिळवलाय. परंतु, आयोजकांनी अजूनपर्यंत संघ विकत घेणाऱ्यांची अधिकृत घोषणा केलेली नाही. 


फ्रंचायझींना मिळालेली शहरं
एका क्रिडा वेबसाईनं दिलेल्या माहितीनुसार, मुंबई इंडियन्सकडून अंबानी कुंटुंबीय, चेन्नईकडून एन.श्रीनिवासन, दिल्ली कॅपिटल्सचे पार्थ जिंदल, सनरायजर्सचे मारन कुटुंबीय, लखनौ सुपर जायंट्सचे संजीव गोयंका, राजस्थान रॉयल्सचं मनोज बदाडे या सहा फ्रंचायजींनी संघ विकत घेतले आहेत. दक्षिण आफ्रिका टी-20 लीगमध्ये मुंबई इंडियन्स (केप टाऊन), चेन्नई सुपर किंग्ज  जोहान्सबर्ग), दिल्ली कॅपिटल्स (सेंच्युरियन), लखनौ सुपर जायंट्स (डरबन), सनरायजर्स हैदराबाद (पोर्ट एलिझाबेथ) आणि राजस्थान रॉयल्सला (पार्ल) अशी शहर मिळाली आहेत. 


मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्जवर सर्वाधिक बोली
दक्षिण आफ्रिका टी-20 लीगमध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिग्जनं संघ विकत घेण्यासाठी 250 कोटींची बोली लावली. आयपीएल मॉडेलनुसार प्रत्येक टीमला 10 वर्षांसाठी फ्रॅन्चायजी फीच्या 10 टक्के द्यावे लागणार आहेत. आयपीएलप्रमाणे दक्षिण आफ्रिका टी-20 लीगही प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करेल, अशी अपेक्षा केली जातं आहे.


हे देखील वाचा-