Birmingham 2022 Commonwealth Games: बर्मिंगहॅम येथे येत्या 28 जुलैपासून कॉमनवेल्थ गेम्सला सुरुवात होणार आहे. यंदाच्या कॉमनवेल्थ गेम्ससाठी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशननं एकूण 322 सदस्यांची घोषणा केलीय. ज्यात 215 खेळाडू आणि 107 अधिकारी आणि सपोर्ट स्टाफचा समावेश आहे. दरम्यान, कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंशी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी संवाद साधला. तसेच मोदींनी खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवत त्यांना कॉमनवेल्थ गेम्ससाठी शुभेच्छा दिल्या आहेत. यादरम्यान नरेंद्र मोदी एका आगळ्या-वेगळ्या अंदाजात पाहायला मिळाले. त्यांनी खेळांडूशी संवाद साधताना "कोई नही टक्कर में, कहा पडे हो चक्कर में", असा डायलॉग म्हणत खेळाडूंना प्रोत्साहित केलं.


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑनलाईनच्या माध्यमातून खेळाडूंशी संवाद साधला. ज्यात विविध खेळातील खेळाडू उपस्थित होते. "या स्पर्धेत पहिल्यांदाच सहभाग घेणारे खेळाडूंही क्रिडाविश्वावर छाप सोडतील, तुम्हाला कसं खेळायचं आहे? कोणत्या रणनीतीनं मैदानात उतरायचं आहे? हे सर्वांना माहिती आहे", असं नरेंद्र मोदी म्हणाले.


मोदींकडून खेळाडूंना विजयी मंत्र
"या स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंनी मनापासून खेळावं, पूर्ण ताकदीनं खेळावं आणि कोणत्याही दबावात राहू नये", असंही नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. पुढे नरेंद्र मोदींनी त्यांचा जुना डायलॉग 'कोई नही टक्कर में, क्यों पडे हो चक्कर में' अशाच वृत्तीनं लढावं, असा मंत्र खेळाडूंना दिला.


15 खेळांमध्ये सहभागी होतील भारतीय खेळाडू
भारतीय खेळाडू 15 खेळ आणि चार पॅरा स्पोर्ट्समध्ये सहभाग घेणार आहे. बॉक्सिंग, बॅडमिंटन, वेटलिफ्टिंग आणि कुस्तीमध्ये भारताला आणखी पदके मिळण्याची अपेक्षा आहे. हॉकी आणि महिला क्रिकेटमध्येही चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. कॉमनवेल्थ गेम्स व्हिलेज अधिकृतपणे 23 जुलै रोजी उघडेल. भारतीय सदस्य येथे पाच वेगवेगळ्या ठिकाणी असेल.



हे देखील वाचा-