Tokyo Olympics 2020 : भारताची सर्वात अनुभवी खेळाडू आणि बॉक्सिंग सुपरस्टार मेरी कोमनं टोकियो ऑलिम्पिकमधील आपला पहिला विजय मिळवला आहे. मेरीसाठी हा सामना जिंकणं सोपं नव्हतं. परंतु, मेरीनं आपल्या अनुभवाच्या जोरावर हा सामना आपल्या बाजूनं फिरवला. महिला बॉक्सिंगमधील पहिला सामना जिंकत मेरीनं पुढच्या फेरीत प्रवेश केला आहे. 


मेरीनं आपल्या अनुभवाच्या जोरावर पुढच्या फएरीत प्रवेश केला आहे. मेरी कोमनं हर्नांडिज गार्सियाचा पराभव करत पुढची फेरी गाठली आहे. सामन्याची सुरुवात झाल्यापासूनच मेरी कोमच्या अुभवाची झलक पाहायला मिळाली. मेरी विरोधी खेळाडूला अटॅक करण्याची फारशी संधी देत नव्हती. खेळाडूपासून अंतर ठेवूनच मेरी खेळताना दिसून आली. पहिल्या राऊंडनंतर मेरीला थोडा फायदा मिळताना दिसून आला. पहिल्या राऊंडनंतर मेरी आक्रमक खेळी करताना दिसून आली. मेरीनं तिसऱ्या राउंडमध्ये येताच अटॅक करणं सुरु केलं. 


टेबल टेनिस महिला एकेरीत मनिका बत्राचा शानदार विजय


टोकियो ऑलिम्पिकमध्ये टेबल टेनिस महिला एकेरीमध्ये भारताच्या मनिका बत्रानं शानदार विजय मिळवला आहे. तिनं युक्रेनच्या मार्गारिटाला 4-3 असं पराभूत केलं. भारताच्या मनिका बत्रानं सुरुवातीला दोन गेम गमावले. ती 0-2 अशी पिछाडीवर होती. त्यानंतर तिनं शानदार वापसी केली आहे. पिछाडीवर असताना मनिकानं 2-2 अशी बरोबरी केली. पुढचा सेट मार्गारिटानं जिंकत पुन्हा आघाडी घेतली. त्यानंतर मनिकानं पुन्हा वापसी केली. मनिका आणि मागरिटा 3-3 अशा बरोबरी झाली. अंतिम गेममध्ये मनिकानं मार्गारिटाला 11-7 असं पराभूत करत विजयावर शिक्कामोर्तब केलं.  


मनु भाकरचं आव्हान संपुष्टात तर सिंधूचा विजय


पदकाची प्रबळ दावेदार म्हणून सर्वांच्या नजरा लागलेल्या मनु भाकरचं आव्हान संपुष्टात आलं. महिलांच्या दहा मीटर एअर पिस्तूलमध्ये मनु भाकर क्वालिफाइंग राउंडमधूनच बाहेर गेली. तिला अंतिम फेरीत आपलं स्थान बनवण्यात मनु अयशस्वी ठरली. तसेच भारताची आणखी एक खेळाडू यशस्विनी देसवालही अंतिम फेरीत आपलं स्थान बनवू शकली नाही. तर बॅडमिंटनमध्ये भारताची स्टार खेळाडू पीव्ही सिंधुनं पहिला विजय मिळवला आहे. पदकाच्या दिशेनं सिंधूनं आपलं पहिलं पाऊल टाकलं आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :