Tokyo Olympics 2020 LIVE : नीरज चोप्राचा 'सुवर्णवेध', टोक्यो ऑलिम्पिक भालाफेकमध्ये निर्विवाद वर्चस्व गाजवत देशासाठी पहिलं गोल्ड मिळवलं
Tokyo Olympics 2020 LIVE : टोकियो ऑलिम्पिकमधील प्रत्येक घडामोडींसाठी क्लिक करा...
नीरज चोप्रा.. पाचवा प्रयत्न फाऊल
चौथ्या फेरीसाठी नीरज सज्ज, चौथा प्रयत्न फाऊल
नीरज चोप्रा तिसरा प्रयत्न 76.79 मीटर भालाफेक
नीरज चोप्रा दुसऱ्या प्रयत्नात पहिल्या प्रयत्नापेक्षा पुढे, 87.58 मीटर भालाफेक
नीरज चोप्रा भालाफेक सुरु, पहिल्याच प्रयत्नात 87.03 मीटर भालाफेक
टोक्यो ऑलिम्पिकमध्ये कुस्तीपटू बजरंग पुनीयाने कांस्य पदक जिंकलं असून कझाकस्तानच्या पैलवानावर 8-0 ने मात केली आहे. 65 किलो वजनी गटातील कुस्तीची कांस्य पदकासाठीची लढाई होती
बजरंग पुनियाने कांस्य पदक पटकावलं
बजरंग पुनिया 6.0 ने आघाडीवर
बजरंग पुनिया 4.0 ने आघाडीवर
बजरंग पुनियाची मॅच सुरु, बजरंग पुनिया 2.0 ने आघाडीवर
Tokyo Olympics 2020 LIVE : गोल्फमधील भारताच्या अदिती अशोकचं आव्हान संपुष्टात, पदक थोडक्यात हुकलं, चौथ्या नंबरवर राहिली अदिती
https://marathi.abplive.com/sports/olympics/tokyo-olympics-2020-21-live-updates-medal-tally-olympics-day-2-india-full-schedule-gold-silver-bronze-medal-olympics-news-pic-995865
भारतीय महिला गोल्फपटू अदिती अशोकची #TokyoOlympics अंतिम फेरीत दमदार खेळी सुरू
गोल्फमध्ये चौथ्या राउंडचा सामना सुरु आहे. भारताची स्टार गोल्फर अदिती अशोकनं आपल्या उत्तम खेळीसह सलग दुसरं स्थान कायम ठेवलं आहे. गेल्या तीन दिवसांपासून अदिती अशोक सलग उत्तम कामगिरी करत आहे. जर अदितीनं पुढच्या काही तासांत जर अशीच गुणांची कमाई केली तर भारतासाठी ती इतिहास रचेल. अदिती भारतासाठी गोल्फमधील पहिलं वहिलं पदकं जिंकू शकते.
कुस्तीपटू बजरंग पुनिया 65 किलो गटातील उपांत्य फेरीत पराभूत, अझरबैजानच्या अलीएवकडून पराभूत. उद्या कांस्य पदकासाठी लढत.
Tokyo Olympics 2020 LIVE : भारताला गोल्फमध्ये पदक मिळण्याची संधी, गोल्फर अदिती अशोकची शानदार कामगिरी
https://marathi.abplive.com/sports/olympics/tokyo-olympics-2020-21-live-updates-medal-tally-olympics-day-2-india-full-schedule-gold-silver-bronze-medal-olympics-news-pic-995865
Tokyo Olympics 2020 LIVE : बजरंग पुनिया सेमीफायनलमध्ये, शानदार विजय, विरोधी पैलवानाला दाखवलं आस्मान
जर्मनीनं सामन्यात बरोबरी साधली असून आपला तिसरा गोल डागला आहे. सध्या सामन्याचा तिसरा क्वार्टर सुरु असून दोन्ही संघांनी प्रत्येकी तीन-तीन गोल डागले आहेत.
सामन्यात भारतीय महिला संघाची धमाकेदार वापसी. भारत 3-2नं आघाडीवर. आक्रमक ब्रिटनला भारताचं प्रत्युत्तर. संयमी खेळी करत मिळवली आघाडी.
भारतानं धमाकेदार खेळी करत दुसरा गोल डागला आहे. त्यामुळए सध्या भारत विरुद्ध ब्रिटन सामना बरोबरीत आहे. दोन्ही संघांनी प्रत्येकी 2-2 गोल डागले आहेत.
ब्रिटनची आक्रमक खेळी. सामन्यात भारत पिछाडीवर. ब्रिटननं डागला दुसरा गोल. भारतीय संघाच्या अडचणीत वाढ.
महिला हॉकी संघाचा सामना सुरु. ब्रिटनची आक्रमक खेळी, तर भारताची संयमी खेळी. ब्रिटननं डागला पहिला गोल. सामन्यात ब्रिटनची 1-0 नं आघाडी.
भारतीय महिला हॉकी संघाचा ब्रिटन विरोधातील सामना सुरु. पहिल्या मिनिटापासून ब्रिटन आक्रमक खेळी करत असल्याचं पाहायला मिळत आहे. भारत मात्र संयमी भूमिकेत असल्याचं पाहायला मिळत आहे.
भारतीय महिला हॉकी संघ आज इतिहास रचण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. ऑलिम्पिक कांस्य पदकासाठी भारतीय महिला हॉकी संघाची लढत ब्रिटनसोबत होणार आहे. भारतीय संघासाठी हा विजय सोपा नसेल. यापूर्वी ग्रुप स्टेज सामन्यांमध्ये भारतानं ब्रिटनला 4-1 नं नमवलं होतं. त्यामुळे आजाचा सामना कोण राखतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
भारताने कांस्यपदक गमावलं, सॅन मरिनोच्या माईल्स अमिनची दीपक पुनियावर मात, दीपक पुनियाचा ४ - २ ने पराभव
कुस्तीत रवि दहियानं पुरुष फ्रीस्टाइल 57 किलो गटात पराभूत झाला असून रविनं रौप्यपदक जिंकले
Tokyo Olympics 2020 LIVE : कुस्ती: विनेश फोगाटचा धक्कादायक पराभव, बेलारुसच्या महिला कुस्तीपटूनं नमवलं
https://marathi.abplive.com/sports/olympics/tokyo-olympics-2020-21-live-updates-medal-tally-olympics-day-2-india-full-schedule-gold-silver-bronze-medal-olympics-news-pic-995865
जर्मनीनं पेनल्टी कॉर्नरवर चौथा गोल डागला आहे. अद्यापही सामन्यात भारत आघाडीवर आहे. भारतानं 5 तर जर्मनीनं 4 गोल डागले आहेत.
जर्मनीला एकापाठोपाठ मिळालेले दोन पेनल्टी कॉर्नर भारताना मागं फिरवून लावले. भारतीय संघाकडून अभेद्य भिंतीप्रमाणे कामगिरी करत श्रीजेशनं जर्मनीचे दोन गोल माघारी धाडले. सध्या सामन्यात भारत आघाडीवर आहे. भारतानं आतापर्यंत 5 तर जर्मनीनं 3 गोल डागले आहेत.
भारताची धमाकेदार खेळी, आक्रमक जर्मनीला भारतीय संघानं टाकलं मागे. सामन्यात सध्या भारत आघाडीवर. भारतानं 5 तर जर्मनीनं 3 गोल डागले.
Tokyo Olympics 2020 LIVE : भारताचा दुसरा गोल, पेनाल्टी कॉर्नरवर साधला गोल, जर्मनीविरुद्ध 3-2 अशी स्थिती
https://marathi.abplive.com/sports/olympics/tokyo-olympics-2020-21-live-updates-medal-tally-olympics-day-2-india-full-schedule-gold-silver-bronze-medal-olympics-news-pic-995865
Tokyo Olympics 2020 LIVE : जर्मनीचे एका पाठोपाठ एक दोन गोल, भारताविरुद्ध 3-1 अशी आघाडी घेतली
दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारतीय संघानं धमाकेदार खेळी करत सामन्यात बरोबरी साधली आहे.
भारत विरुद्ध जर्मनी यांच्यात कांस्य पदकासाठीचा सामना सुरु झाला आहे. सामन्यातील पहिल्या क्वार्टरमध्ये गोल डागत जर्मनीनं आघाडी घेतली आहे.
हॉकीचा सामना सुरु होताच अवघ्या काही मिनिटांतच जर्मनीनं आपला पहिला गोल डागला आहे. यापूर्वीचे जर्मनीचे दोन गोल भारतीय संघाच्या श्रीजेशनं माघारी धाडले होते. अखेर जर्मनीनं आपल्या आक्रमक खेळीच्या जोरावर आपला पहिला गोल डागत सामन्याता आघाडी घेतली आहे.
अटी-तटीच्या लढतीत जर्मनीचा दबदबा दिसून येत आहे. भारतीय संघाकडून अभेद्य भिंतीप्रमाणे कामगिरी करत श्रीजेशनं जर्मनीचे दोन गोल माघारी धाडले आहेत. परंतु, जर्मनीनं बॉलवर कब्जा मिळवलेला आहे. जर्मनीचा संघ सतत गोल करण्यासाठी आक्रमक खेळी करत आहे.
पुरुष हॉकी संघासाठी सुवर्णपदकाच्या आशा मावळल्या असल्या तरी, 41 वर्षांनी सेमीफायनल्स गाठलेल्या हॉकी संघासाठी कांस्य पदकंही कमी नाही. कांस्य पदकावर नाव कोरण्याच्या आशेसह आता भारतीय पुरुष हॉकी संघ आज जर्मनीशी लढणार आहे. हा सामना सकाळी 7 वाजता सुरु झाला आहे.
भारतीय महिला हॉकी संघाचा उपांत्य फेरीत अर्जेंटिनाकडून 2-1 असा पराभव; सुवर्णपदकाची आशा गमावली
महिला हॅाकी सामना मध्यंतरापर्यंत बरोबरीत, दोन्ही संघाचे प्रत्येकी एक गोल
महिला हॉकी संघाची दमदार सुरुवात, गुरजीत कौरने केला पहिला गोल
मोठी बातमी... कुस्तीत भारताला एक पदक निश्चित, कजागिस्तानच्या पैलवानाला हरवत रवि दहिया फायनलमध्ये
कुस्तीच्या 86 किलोग्राम गटात भारताच्या दीपक पुनियानं शानदार विजय साजरा केला. दीपकनं नायजेरियाच्या कुस्तीपटूला 13-1 असं हरवत क्वार्टर फायनलमध्ये जागा मिळवली आहे.
कुस्तीमध्ये रवि दहियानं प्री क्वार्टर फायनल सामन्यात बाजी मारली आहे. रविनं हा सामना एकतर्फी जिंकला. त्यानं कोलंबियाच्या कुस्तीपटूला 13-2 असा पराभव केला.
कुस्तीमध्ये अंशु मलिकचं आव्हान संपुष्टात आलं आहे. अंशू मलिकचा बेलारूसच्या ऐलिनानं पराभव केला.
ऑलिम्पिकमधील आजच्या दिवसाची सुरुवात भारतासाठी सकारात्मक ठरली. भारतासाठी स्टार अॅथलीट नीरज चोप्रानं जेलवीन थ्रोच्या अंतिम सामन्यात जागा बनवली आहे. नीरज चोप्रासमोर फायनल्स गाठण्यासाठी 83.5 मीटरचं टार्गेट होतं. परंतु, नीरजनं 86.65 चा थ्रो करत फायनल्समध्ये धमाकेदार एन्ट्री घेतली आहे.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारत आणि बेल्जियममध्ये खेळवण्यात आलेला सेमीफायनल्सच्या सामन्यात भारताच्या पदरी निराशा आली आहे. सामन्यात बेल्जियमनं 5-2नं सामना आपल्या बाजूनं वळवला आहे. फायनल्स गाठण्याचं भारताचं स्वप्न भंगलं.
बेल्जियमची आघाडी. आणखी एक गोल डागत भारताला टाकलं मागे
भारत आणि बेल्जियम यांच्यात खेळवण्यात येणाऱ्या सामन्यातील दुसरा क्वार्टर संपला. हा क्वार्टर अत्यंत रोमांचक पाहायला मिळाला. यामध्ये दोन्ही संघांना पेनल्टी कॉर्नर मिळाले. सध्या सामना 2-2 अशा बरोबरीत सुरु आहे.
दुसऱ्या क्वार्टरमध्ये बेल्जियमला आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिळाला. पेनल्टी कॉर्नवर गोल डागण्यात भारतीय संघ यशस्वी ठरला. सध्या सामन्यात 2-2 अशा बरोबरीवर येऊन पोहोचला आहे.
सामन्याच्या दुसऱ्या क्वॉर्टरच्या सुरुवातीलाच बेल्जियमनं पेनल्टी कॉर्नरनं भारतावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न केला. पण भारतानं बेल्जियमचा हा प्रयत्न हाणून पाडला.
वर्ल्ड चॅम्पियन असलेल्या बेल्जियमनं सामन्याच्या सुरुवातीलाच धमाकेदार खेळी करत 1-0 अशा फरकानं आघाडी घेतली होती. परंतु, सातव्या मिनिटाला भारतानं खेळात वापसी करत आपला पहिला गोल डागला. सध्या टीम इंजिया 2-1 अशा फरकानं आघाडीवर आहे. भारताकडून हरमनप्रीत सिंह आणि मनदीप सिंह शानदार खेळी करत आहेत.
भारतानं बेल्जियमला पिछाडीवर टाकत दोन गोल डागले. वर्ल्ड चॅम्पियन बेल्जियमला भारतीय हॉकी संघानं पिछाडीवर टाकलं असून सामन्यात 2-1 अशी आघाडी घेतली आहे.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये पुरुष हॉकी सामन्यात वर्ल्ड चॅम्पियन बेल्जियमने भारता विरोधात सामन्याच्या सुरुवातीपासूनच आघाडी घेतली आहे. बेल्जियमच्या संघा सध्या 1-0 अशा फरकानं आघाडीवर आहे. बेल्जियमनं आपला पहिला गोल डागला आहे.
मंगळवारी भारतीय पुरुष हॉकी संघ बेल्जियमच्या संघासोबत आपला उंपांत्य सामना खेळणार आहे. या सामन्यात पदकावर नाव कोरण्यासाठी काँटे की टक्कर पाहायला मिळू शकते. याव्यतिरिक्त अनु रानी, महिला भालाफेक क्वॉलीफिकेशन ग्रुप एमध्ये सकाळी 05.50 मिनिटांनी आणि तेजिंदरपाल सिंह तूर, पुरुष गोळाफेक क्वॉलिफिकेशन ग्रुप एमध्ये पदकाच्या दिशेनं एक पाऊल पुढं टाकण्यासाठी प्रयत्नशील असतील. एकूणच पाहता टोकियो ऑलिम्पिकमध्ये अकरावा दिवस भारतासाठी महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे.
धावपटू दुती चंद 200 मीटर हीट चारमध्ये सातव्या क्रमांकावर राहिली. दुतीच्या सेमिफायनलमध्ये पोहोचण्याच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. तिनं हीटमध्ये 23.85 सेकंद एवढा वेळ घेतला. दुतीचा या प्रकारात वैयक्तिक बेस्ट 23.00 सेकंदांचा आहे.
Tokyo Olympics 2020 LIVE : बॉक्सिंगमध्ये सतिशकुमारकडून निराशा, क्वार्टर फायनलमध्ये पराभव, आव्हान संपुष्टात
https://marathi.abplive.com/sports/olympics/tokyo-olympics-2020-21-live-updates-medal-tally-olympics-day-2-india-full-schedule-gold-silver-bronze-medal-olympics-news-pic-995865
Tokyo Olympics 2020 LIVE : भारतीय महिला संघाचा दक्षिण आफ्रिकेवर शानदार विजय, 4-3 नं केला आफ्रिकेचा पराभव, ऑलिम्पिकमधील आव्हान कायम
#Olympics
https://marathi.abplive.com/sports/olympics/tokyo-olympics-2020-21-live-updates-medal-tally-olympics-day-2-india-full-schedule-gold-silver-bronze-medal-olympics-news-pic-995865
भारतीय महिला संघाकडून दुसरा गोल, भारताची 2-1 नं आघाडी, दोन्ही गोल वंदना कटारियानं केले, दक्षिण आफ्रिकेकडून पहिल्या क्वार्टरच्या शेवटच्या मिनिटात एक गोल केला होता.
Tokyo Olympics 2020 LIVE : भारतीय महिला हॉकी संघाची चांगली सुरुवात, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला गोल, 1-0 नं आघाडी
डिस्कस थ्रो या प्रकारात कमलप्रीत कौरने इतिहास रचला आहे. आपल्या तिसऱ्या प्रयत्नात कमलप्रीतने 64 मीटर स्कोर केला आहे. असं रेकॉर्ड करणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू बनली आहे. यामुळे कमलप्रीत कौरने फायनलमध्ये आपलं स्थान पक्कं केलं असून ती आता पदक मिळवण्यासाठी प्रबळ दावेदार समजली जाते.
डिस्कस थ्रोमध्ये कमलप्रीत कौरनं इतिहास रचला आहे. आपल्या तिसऱ्या प्रयत्नात कमलप्रीत कौरनं 64 मीटर स्कोर केला आहे. कमलप्रीत कौर ही भारताकडून विक्रमी स्कोअर करणारी खेळाडू ठरली आहे. कमलप्रीत कौरनं फायनलमध्ये आपलं स्थान पक्कं केलं आहे. सोबतच ती पदकाची दावेदार देखील झाली आहे.
तिरंदाजीमध्ये भारताचं आव्हान संपुष्टात आलं आहे. भारताचा तिरंदाज अतानू दास राउंड ऑफ 16 मध्ये पराभूत झाला आहे. अतानु दास आणि जपानच्या खेळाडूमध्ये रंगलेला हा सामना चांगलाच चुरशीचा झाला. शेवटच्या सेटमध्ये अतानूकडून एक चूक झाली आणि त्यानं सामना गमावला. अतानू दाससह भारताचे सर्व तीन तिरंदाज आधीच बाहेर गेले आहेत.
बॉक्सिंगमध्ये भारताचा अमित पंघाल राउंड ऑफ 16 च्या रेसमधून बाहेर पडला आहे. अमितनं पहिला राऊंड जिंकला होता मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या राऊंडमध्ये तो पराभूत झाला. अमित पंघालकडून भारताला पदकाची अपेक्षा होती. मात्र त्याचा टोकियो ऑलिम्पिकमधील आव्हान या पराभवासह संपुष्टात आलं आहे.
Tokyo Olympics 2020 LIVE : भारताची निराशाजनक सुरुवात, बॉक्सिंगमध्ये अमित पंघाल पराभूत तर तिरंदाजीत अतानू दासचं आव्हानही संपुष्टात #Olympics
फायनलचं तिकीट मिळवण्यासाठी पीव्ही सिंधू मैदानात उतरणार तर पूजा राणीकडेही पदक निश्चित करण्याची संधी
Tokyo Olympics 2020 LIVE : पीव्ही सिंधूचा शानदार विजय, सलग दोन सेट जिंकत मारली बाजी, सेमीफायनलमध्ये मुसंडी
https://marathi.abplive.com/sports/olympics/tokyo-olympics-2020-21-live-updates-medal-tally-olympics-day-2-india-full-schedule-gold-silver-bronze-medal-olympics-news-pic-995865
Tokyo Olympics 2020 LIVE : तिरंदाजीत दीपिका कुमारीकडून निराशा, कोरियाच्या एम सेनकडून क्वार्टर फायनलमध्ये सलग तीन सेटमध्ये पराभव, आव्हान संपुष्टात
भारतीय महिला हॉकी संघाने आयर्लंडवर 1-0 अशी मात करत विजय मिळवला आहे.
भारतीय महिला हॉकी संघाने आयर्लंडवर 1-0 अशी मात करत विजय मिळवला आहे.
नेमबाजीत भारतासाठी पदकाची अपेक्षा संपताना दिसत आहे. 25 मीटर एअर पिस्तूल इव्हेंटमध्ये क्वालिफिकेशन आणि रॅपिड राउंडमध्ये मनु भाकरनं एकूण 582 गुण मिळवले आणि ती 11व्या क्रमांकावर राहिली. टॉप 8 खेळाडूंनाच फायनल्समध्ये स्थान मिळतं. त्यामुळे आपलं पहिलं ऑलिम्पिक खेळणाऱ्या मनु भाकरचं आव्हान संपुष्टात आलं आहे.
तीरंदाजीत दीपिका कुमारीनं क्वार्टर फायनल्समध्ये धडक दिली आहे. भारताला दीपिका कुमारीकडून पदकाची अपेक्षा आहे. दीपिका कुमारी जगातील अव्वल तीरंदाजांपैकी एक आहे. दीपिका कुमारी आज क्वार्टर फायनल्सच्या सामना आज खेळणार आहे. एवढंच नाहीतर दीपिकाचा पती आणि भारतीय तीरंदाज अतानू दासनंही क्वार्टर फायनल्समध्ये स्थान मिळवलं आहे.
तीरंदाजीत दीपिका कुमारीनं क्वार्टर फायनल्समध्ये धडक दिली आहे. भारताला दीपिका कुमारीकडून पदकाची अपेक्षा आहे. दीपिका कुमारी जगातील अव्वल तीरंदाजांपैकी एक आहे. दीपिका कुमारी आज क्वार्टर फायनल्सच्या सामना आज खेळणार आहे. एवढंच नाहीतर दीपिकाचा पती आणि भारतीय तीरंदाज अतानू दासनंही क्वार्टर फायनल्समध्ये स्थान मिळवलं आहे.
बॉक्सिंगमध्येही भारतानं बाजी मारली आहे. 91 किलोग्राम कॅटेगरीमध्ये सतीशनं क्वार्टर फायनलमध्ये स्थान मिळवलं आहे. सतीश कुमारनं जमैकाच्या बॉक्सरला नमवत विजय मिळवला आहे. भारतासाठी सातव्या दिवसाची सुरुवात अत्यंत सकारात्मक झाली आहे. बॉक्सिंमध्येही पदक मिळण्याच्या आसा उंचावल्या आहेत.
धनुर्विद्येत अतनूचा विजय, अतनू आणि डेंग यांच्या काँटे की टक्कर दिसून आली. अखेर शेवटच्या शॉर्टमध्ये अतनूनं विजय मिळवला. अतनूनं तीन सेटमध्ये जिंकत सामना आपल्या नावे केला. अतनूनं धनुर्विद्येत भारताला पदक मिळवून देण्याच्या दिशेनं एक पाऊल पुढं टाकलं आहे.
भारतीय पुरुष हॉकी संघानं अर्जेंटीनावर मात करत 3-1 अशा फरकानं विजय मिळवला आहे. भारतानं अर्जेंटीनासारख्या मजबूत संघाला पराभूत करत पुढच्या फेरीत प्रवेश मिळवला आहे. भारतीय पुरुष हॉकी संघाकडून विजयाच्या अपेक्षा वाढल्या आहेत. भारतानं ऑस्ट्रेलियासोबतच्या सामन्यात पराभव झाल्यानंतर सलग दोन सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. भारतीय पुरुष हॉकी संघ सध्या फॉर्मात आहे.
भारताच्या पीव्ही सिंधूने डेन्मार्कच्या मियावर मात करत क्वॉर्टर फायनलमध्ये धडक मारली आहे. त्यामुळे भारताला पदक मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
अर्जेंटिना विरुद्ध सुरु असलेल्या तिसऱ्या क्वॉर्टर फायनलच्या सामन्यात भारताने पहिला गोल केला असून 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारताकडे हा सामना जिंकण्याची सुवर्णसंधी आहे.
पीव्ही सिंधू क्वॉर्टर फायनल्समध्ये स्थान मिळवणार हे जवळपास स्पष्ट झालं आहे. पहिला गेम जिंकल्यानंतर दुसऱ्या गेममध्येही सिंधू आघाडीवर आहे. पीव्ही सिंधू 11-6च्या फरकानं आघाडीवर आहे.
पीव्ही सिंधू ऑलिम्पिकमध्ये आपली उत्तम कामगिरी करताना दिसून येत आहे. राउंड ऑफ 16च्या स्पर्धेत पीव्ही सिंधूनं डेन्मार्कच्या मिया विरोधातील पहिला गेम जिंकला आहे. पीव्ही सिंधूनं पहिला गेम 21-15 नं आपल्या नावे केला आहे.
भारतीयांना मेडलची सर्वाधिक अपेक्षा बॅटमिंटन स्टार पीव्ही सिंधूकडून आहे. पीव्ही सिंधू राउंड ऑफ 16 च्या सामन्यासाठी आज मैदानात उतरली आहे. या सामन्या विजय मिळवून पदकाच्या दिशेनं आणखी एक पाऊल पुढं टाकण्यासाठी सिंधू सज्ज आहे. सामन्याच्या सुरुवातीपासूनच पीव्ही सिंधू फॉर्मात दिसत आहे. पीव्ही सिंधूनं आपल्या विरोधात खेळत असलेल्या डेन्मार्कच्या मिया ब्लिचफेल्टला कोणतीही संधी दिलेली नाही. पीव्ही सिंधूनं पहिल्या सेटमध्ये 11-6 अशी आघाडी घेतली आहे.
हॉकीच्या सामन्यात आज भारतीय पुरुष संघ अर्जेंटीनाच्या विरोधात खेळण्यासाठी मैदानावर उतरली आहे. या सामन्याची सुरुवात सकाळी 6 वाजता होणार आहे. भारतीय हॉकी संघाचे चाहते. विजयाची अपेक्षा करत आहेत.
हॉकीच्या सामन्यात आज भारतीय पुरुष संघ अर्जेंटीनाच्या विरोधात खेळण्यासाठी मैदानावर उतरली आहे. या सामन्याची सुरुवात सकाळी 6 वाजता होणार आहे. भारतीय हॉकी संघाचे चाहते. विजयाची अपेक्षा करत आहेत.
Tokyo Olympics 2020 LIVE : बॉक्सिंगमध्ये पूजा राणीचा विजय, उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश, आणखी एक सामना जिंकला तर पदक निश्चित
Tokyo Olympics 2020 LIVE : तिरंदाजीत दीपिका कुमारीचा शानदार विजय, सलग तीन सेट जिंकत राऊंड ऑफ 16 मध्ये प्रवेश, दीपिकाकडून पदकाची अपेक्षा
Tokyo Olympics 2020 LIVE : तिरंदाजीत भारताच्या पदरी निराशा, प्रवीण जाधवचा पराभव, अमेरिकेच्या अॅलेक्सनचा विजय, प्रवीणचं आव्हान संपुष्टात
Tokyo Olympics 2020 LIVE : तिरंदाजीत प्रवीण जाधवचा शानदार विजय, सलग तीन सेट जिंकत पुढील फेरीत प्रवेश
तिरंदाजीत प्रवीण जाधवची शानदार कामगिरी, दोन सेट जिंकत आघाडीवर
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताची स्टार बॅडमिन्टन खेळाडू पीव्ही सिंधूचं उत्तम प्रदर्शन पाहायला मिळत आहे. पीव्ही सिंधूनं आणखी एक विजय मिलवला आहे. सिंधूनं प्री-क्वॉर्टर फायनल्समध्ये धडक दिली आहे. सिंधुनं हाँगकाँगच्या खेळाडूला सरळ सेटमध्ये 21-9, 21-16 नं पराभूत केलं. सिंधूनं पदकाच्या दिशेनं आणखी एक पाऊल पुढं टाकलं आहे.
भारतीय महिला हॉकी टीमचा टोकियो ऑलिम्पिकमध्ये सलग तिसऱ्यांदा भारतीय महिला संघाचा पराभव झाला आहे. ग्रेट ब्रिटननं भारतीय महिला संघाला 4-1 अशी मात दिली. याआधीच्या सामन्यात जर्मनीनं भारतीय महिला संघाचा 2-0 असा पराभव केला होता.
धनुर्विद्येत भारतासाठी आनंदाची बातमी आहे. राउंड ऑफ 32 मध्ये तरुणदीप रॉयने विजय मिळवला आहे. तरुणदीप रॉय आता पुढच्या राउंडमध्ये पोहोचला आहे. तरुणदीप रॉयकडून भारताला पदकाची अपेक्षा आहे. तरुणदीप रॉयने यापूर्वीच्या टीम इव्हेंटमध्येही उत्तम कामगिरी केली होती.
भारतीय महिला हॉकी संघाला पहिल्या क्वॉर्टरमध्ये एकही गोल डागता आला नाही. पण आता भारतीय महिला संघानं वापसी केली आहे. हाफ टाइमच्या आधी पहिला गोल केला आहे. सध्या भारतानं एक गोल तर ब्रिटननं 2 गोल केले आहेत.
टेबल टेनिसमध्ये भारताच्या हाती निराशा. चीनच्या लोंग मानं भारताच्या शरत कमलचा पराभव करत सामन्यात विजय मिळवला आहे. लोंगनं हा गेम 11-4 अशा फरकानं जिंकला. या सामन्यातील पराभवासह शरत कमलचा टोकियो ऑलिम्पिकमधील प्रवास इथेच थांबला आहे.
भारतीय हॉकी संघानं ऑस्ट्रेलियाकडून मिळालेला परभाव मागे सारत मंगळवारी स्पेनचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला. भारतानं स्पेनला 3-0 अशा फरकानं नमवलं. भारतानं पहिले दोन गोल पहिल्या क्वॉर्टरमध्ये डागला, तर तिसरा गोल शेवटच्या क्वॉर्टरमध्ये डागला. स्पेनचा संघ आठ पेनल्टी कॉर्नर मिळाल्यानंतरही गोल करण्यात अयशस्वी ठरला.
यापूर्वी शूटिंगमध्ये अभिषेक वर्मा आणि यशस्विनी देसवाल ही जोडीही फारशी चांगली कामगिरी करु शकली नाही. या दोघांची जोडी पहिल्याच राउंडमध्ये बाहेर गेली. यामध्ये अभिषेकनं 92 तर यशस्विनीनं 95 गुण मिळवले होते. टोकियो ऑलिम्पिकमध्ये या दोघांचं आव्हान संपुष्टात आलं असून त्यांचा प्रवासही थांबला आहे.
मनु भाकर आणि सौरभ चौधरी या जोडीचं ऑलिम्पिकमधील आव्हान संपुष्टात आलं आहे. ही जोडी फायनल्समध्ये जागा बनवण्यात अयशस्वी ठरली. 10 मीटर एअर पिस्तूलच्या मिश्र दुहेरी प्रकारात मनु आणि सौरभचं आव्हान संपुष्टात आलं आहे. दरम्यान, पहिल्या क्वॉलिफाइंग राउंडमध्ये या जोडीनं टॉप केलं होतं. परंतु, दुसऱ्या राउंडमध्ये ही जोडी फारसं चांगलं प्रदर्शन करु शकली नाही.
टोकियो ऑलिम्पिकवर चक्रीवादळाचं सावट, तेपार्तक वादळामुळं अनेक स्पर्धा पुढे ढकलल्या,
Tokyo Olympics 2020 LIVE : टेबल टेनिसमध्ये मोठी निराशा, भारताची मनिका बत्राचं आव्हान संपुष्टात, ऑस्ट्रियाच्या सोफियाचा 4-0 नं विजय
सुमित नागलला टेनिसमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. टेनिसच्या सामन्यात दानिल मेदवेदेव यांनी सुमित नागलचा 6-2,6-1 ने पराभव केला. यासोबतच नागलचा टोकियो ऑलिम्पिकमधील प्रवास संपुष्टात आला. हा सामना 66 मिनिटं चालला.
तिरंदाजीत पुरुष सांघिकमधून भारतीय संघ बाहेर, दक्षिण कोरियानं सलग तीन सेट जिंकत मिळवला विजय
टेबल टेनिसमध्ये भारतानं पोर्तुगालला हरवत बाजी मारली आहे. भारताच्या शरथ कमलनं पोर्तुगालच्या तियागो अपोलोनियाला 4-2 नं पराभूत करुन पुरुष एकेरीच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे.
सीए भवानी देवीचं आव्हान संपुष्टात आलं असून टोकियो ऑलिम्पिक 2020 मधील प्रवास संपला आहे. महिला सेबर व्यक्तिगत टेबल ऑफ 32 मध्ये भवानीचा सामना फ्रांन्सच्या मॅनॉन ब्रूनेटसोबत झाला. या सामन्यात फ्रांन्सच्या मॅनॉन ब्रूनेटनं भवानी देवीचा 7-15 नं पराभव केला.
कझाकिस्तानचा 6-2 असा परभव करत पुरुषांच्या धनुर्विद्या स्पर्धेत भारतानं विजय मिळवला आहे. भारतीय पुरुष संघानं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला आहे. प्रवीण जाधव, अतनू दास आणि तरुणदीप राय या संघानं क्वॉर्टर फायनल्समध्ये प्रवेश मिळवला आहे.
Tokyo Olympics 2020 : टोकियो ऑलिम्पिकमध्ये आज भारताची सुरुवात धमाकेदार झाली. भारताची सीए भवानी देवीनं इतिहास रचत ट्यूनिशियाच्या नादिया बेन अजिजचा पराभव करत तलवारबाजीचा सामना जिंकला आहे. ऑलिम्पिकमध्ये तलवारबाजीचा सामना जिंकणारी भवानी देवी भारताची पहिली महिला खेळाडू आहे.
भारताची स्टार बॉक्सिंग खेळाडू मेरी कोम मैदानावर उतरली असून सामना सुरु झाला आहे. सपूर्ण देशाला मेरी कोमकडून पदकाची अपेक्षा आहे.
टेबल टेनिस महिला एकेरीमध्ये भारताच्या मनिका बत्रानं शानदार वापसी केली आहे. मनिकानं युक्रेनच्या मार्गारिटाला 4-3 अशा फरकानं हरवलं. पिछाडीवर असताना मनिकानं 2-2 अशी बरोबरी केली. मनिका आणि मागरिटा 3-3 अशा बरोबरी झाली. अंतिम गेममध्ये मनिकानं मार्गारिटाला 11-7 असं पराभूत केलं.
टेबल टेनिस महिला एकेरीमध्ये भारताच्या मनिका बत्रानं शानदार वापसी केली आहे. 0-2 नं पिछाडीवर असताना तिनं 2-2 अशी बरोबरी केली. आता सातव्या गेमपर्यंत सामना पोहोचला आहे. मनिका आणि मागरिटा 3-3 अशा बरोबरीत आहेत.
टेबल टेनिस पुरुष एकेरीत भारताला निराशा हाती लागली आहे. भारताच्या जी साथियानचा 3-1 आघाडी घेऊनही पराभव, शेवटचे तीन गेम गमावले, हॉंगकॉंगच्या खेळाडूनं साथियानला 4-3 असं हरवलं
पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूलमधून दिव्यांश-दीपक यांचं आव्हान संपुष्टात. पुरुष 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात क्वालिफाईंग राउंडमध्ये भारताचं आव्हान संपुष्टात आलं आहे. भारताचे दिव्यांश पवार आणि दीपक कुमार यांचं प्रदर्शन निराशाजनक राहिलं. दीपक 26व्या स्थानी, तर दिव्यांश 32व्या स्थानी. अंतिम फेरीत केवळ 8 जणांना प्रवेश देण्यात येतो. त्यामुळो दीपक आणि दिव्यांश दोघांचंही आव्हान संपुष्टात आलं आहे.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या पुरुष नौकायन टीमची उत्तम कामगिरी. अर्जुन लाल जाट आणि अरविंद सिंह या भारतीय जोडीनं पुरुष नौकायान लाइटवेट डबलस्कल्स स्पर्धेच्या सेमीफायनल्समध्ये जागा बनवली. भारतीय जोडीनं 6:51.36 ची वेळ गाठत उपांत्य फेरीत स्थान मिळवलं आहे.
Tokyo Olympics 2020 LIVE : सानिया मिर्झा आणि अंकिता रैनानं दुसरा सेट गमावला, टाय ब्रेकरपर्यंत गेलेला सामना गमावला, दुसऱ्या सेटमध्ये 6-7 असा पराभव
https://marathi.abplive.com/sports/olympics/tokyo-olympics-2020-21-live-updates-medal-tally-olympics-day-2-india-full-schedule-gold-silver-bronze-medal-olympics-news-pic-995865
टेनिसमध्ये मिश्र दुहेरीत पहिल्या सामन्यात भारताची सानिया मिर्झा आणि अंकिता रैनाच्या जोडीनं शानदार सुरुवात केली आहे. त्यांनी यूक्रेनच्या नादिया आणि ल्यूडमयलाविरुद्ध पहिला सेट 6-0 असा जिंकला आहे.
बॅडमिंटनमध्ये भारताची स्टार खेळाडू पीव्ही सिंधुचा पहिला विजय, 28 व्या मिनिटाला मिळवला सोपा विजय, पदकाकडे वाटचाल
Mirabai Chanu Wins Medal: टोकियो इथं सुरु असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला पहिलं पदक मिळालं आहे. मीराबाई चानूनं दिलं भारताला पहिलं पदक मिळवून दिलं आहे. वेटलिफ्टिंगमध्ये 49 किलो वजन गटात तिनं रौप्यपदक मिळवलं आहे. मीराबाई चानूनं शानदार प्रदर्शन करत वेटलिफ्टिंगमध्ये स्नॅच प्रकारात 87 किलो वजन उचललं तर क्लीन अॅंड जर्कमध्ये मीराबाई चानूनं 115 किलो वजन उचलत पदकावर शिक्कामोर्तब केलं. मीराबाई चानूनं वेटलिफ्टिंगमध्ये भारताला ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात दुसरं पदक मिळवून दिलं आहे. भारताकडून वेटलिफ्टिंगमध्ये सिल्व्हर मेडल जिंकणारी ती पहिली महिला खेळाडू आहे.
ऑलिम्पिकमध्ये तीरंदाजी स्पर्धेत दीपिका कुमारी आणि प्रवीण जाधव या जोडीनं क्वार्टर फायनलमध्ये धडक मारली होती. मात्र या जोडी सेमीफायनलमध्ये पोहोचता आलं नाही.
10 मीटर एअर पिस्टल (पुरुष) स्पर्धेत सौरभ चौधरीनं जबरदस्त प्रदर्शन केलं आहे. सौरभ चौधरीनं 10 मीटर एअर पिस्टलच्या फायनलमध्ये पोहोचला आहे. सौरभ चौधरीने 586 स्कोअर केला आहे. भारताचा अभिषेक वर्मा मात्र फायनलमध्ये पोहोचू शकला नाही.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये 10 मीटर्स एअर रायफल नेमबाजीत भारताची इलावेनिल वालारिवन 16 व्या, तर अपूर्वी चंडेला 36व्या स्थानावर राहिली. दोघींचं आव्हान प्राथमिक फेरीत संपुष्टात आलं आहे.
भारतीय पुरुष हॉकी संघानं ऑलिम्पिकमध्ये विजयी सुरुवात केली आहे. न्यूझीलंडवर 3-2 अशी मात करत भारतानं विजयी आरंभ केला आहे. भारतीय संघानं शेवटच्या क्वार्टरमध्ये आपली आघाडी कायम ठेवत शानदार विजय मिळवला आहे. हरमनप्रीतनं भारताकडून दोन गोल केले तर एक गोल रुपेंद्रनं केला. आता रविवारी भारताची लढत ऑस्ट्रेलियासोबत असणार आहे.
टेबल टेनिसच्या मिक्स्ड डबल्स स्पर्धेत भारताचं आव्हान संपुष्टात आलं आहे. भारताची मनिका बत्रा आणि शरत कमल ही या जोडीला चीनच्या ताइपे जोडीनं मात दिली.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये पहिलं सुवर्णपदक चीनच्या खात्यात गेलं आहे. 10 मीटर एअर रायफलमध्ये चीननं सुवर्णपदक मिळवलं आहे. चीनची यांग कियान हिनं 251.8 स्कोअर करत गोल्ड मेडल प्राप्त केलं आहे. यांग कियाननं हा स्कोर करत ऑलिम्पिकमध्ये रेकॉर्ड देखील केलं आहे.
पार्श्वभूमी
Tokyo Olympics 2020 LIVE : भारतीय महिला हॉकी संघाचा ग्रेट ब्रिटनकडून 4-3 असा पराभव झाला. इतिहास रचण्यासाठी मैदानावर उतरलेल्या भारतीय महिला संघानं कांस्य पदकासाठीच्या या लढतीत शानदार कामगिरी केली मात्र एका गोलच्या फरकानं पराभवाचा सामना करावा लागला. भारतीय पुरुष हॉकी संघानं 41 वर्षांचा पदकाचा दुष्काळ संपवत कांस्य पदकावर नाव कोरल्यानंतर आज महिला संघाकडून महिला हॉकीतील पहिल्या पदकाची अपेक्षा होती. भारताच्या लेकींनी या सामन्यात यासाठी पुरेपूर प्रयत्न केले मात्र ते अपुरे पडले.
Ravi Dahiya Wins Silver: रवी कुमार दहियाची 'सुवर्ण'संधी हुकली, रौप्य पदकावर समाधान
Tokyo Olympics 2020 : भारताला टोकियो इथं सुरु असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत गुरुवारी सुवर्णपदकाने हुलकावणी दिली. कुस्तीमध्ये पैलवान रवि दहियाकडून सुवर्णपदकाची अपेक्षा केली जात होती, पण त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. कुस्तीत रवि दहियानं पुरुष फ्रीस्टाइल 57 किलो गटात रविनं रौप्यपदक जिंकले आहे.
रवि कुमार दहियाचा सामना रूसीचा पैलवाना जवुर यूगेव सोबत होता. पुरुष फ्रीस्टाइल 57 किलो गटात रविनं हे यश मिळवलं आहे. रौप्य पदक जिंकल्यानंतर हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी चार कोटी रुपयाचे बक्षिस जाहीर केले आहे. सामन्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील पैलवान रवि दहियाचे अभिनंदन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "रवि कुमार दहिया एक उत्कृष्ट पैलवान आहे. टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये रौप्य पदक जिंकल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. भारताला त्यांचा अभिमान आहे."
IND vs GER, Hockey Match : भारतीय हॉकी संघानं इतिहास रचला, कांस्यपदकावर शिक्कामोर्तब
IND vs GER, Hockey Match : भारतीय हॉकी संघानं इतिहास रचत आक्रमक जर्मनीवर मात करत कांस्यपदकावर शिक्कामोर्तब केला आहे. तब्बल 41 वर्षांनी भारतीय पुरुष संघानं धमाकेदार खेळी करत ऑलिम्पिक पदक पटकावलं आहे. अटी-तटीच्या सामन्यात भारतानं जर्मनीचा 5-4 अशा फरकानं पराभव केला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच जर्मनी आक्रमक खेळी करत होती. सामना सुरु झाल्यावर अवघ्या काही मिनिटांतच पहिला गोल डागत जर्मनीनं आघाडी घेतली होती. पण, भारतानं आपल्या संयमी खेळीच्या जोरावर जर्मनीचं आव्हान संपुष्टात आणलं. भारताचा गोलकिपर श्रीजेशनं उत्तम खेळी करत जर्मनीचे अनेक गोल परतवून लावले. श्रीजेशच्या अभेद्य भिंतीमुळेच भारताचा विजय सोपा झाला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
भारतासाठी सिमरनजीत सिंहने दोन, हरमनप्रीत सिंह, रुपिंदर पाल सिंह आणि हार्दिक सिंहनं प्रत्येक एक-एक गोल डागत सामन्यात जर्मनीवर मात करण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावली. भारताची सुरुवात काहीशी निराशाजनक होती. जर्मनीनं सामन्याच्या पहिल्या मिनिटालाच गोल डागल 1-0 नं आघाडी घेतली होती. जर्मनीच्या वतीनं तिमुर ओरुजनं गोल केला होता. भारताला पाचव्या मिनिटाला वापसी करण्याची संधी मिळाली. पण पेनल्टी कॉर्नवर गोल करण्यात रुपिंदर पाल सिंह अयशस्वी ठरला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -