Tokyo Olympic : टोकियो ऑलिम्पिकच्या तिसऱ्या दिवशी भारताची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाल्याचं पाहायला मिळालं. पदकाची प्रबळ दावेदार म्हणून सर्वांच्या नजरा लागलेल्या मनु भाकरचं आव्हान संपुष्टात आलं. महिलांच्या दहा मीटर एअर पिस्तूलमध्ये मनु भाकर क्वालिफाइंग राउंडमधूनच बाहेर गेली. तिला अंतिम फेरीत आपलं स्थान बनवण्यात मनु अयशस्वी ठरली. तसेच भारताची आणखी एक खेळाडू यशस्विनी देसवालही अंतिम फेरीत आपलं स्थान बनवू शकली नाही. तर बॅडमिंटनमध्ये भारताची स्टार खेळाडू पीव्ही सिंधुनं पहिला विजय मिळवला आहे. पदकाच्या दिशेनं सिंधूनं आपलं पहिलं पाऊल टाकलं आहे.
महिलांच्या दहा मीटर एअर पिस्तूलमध्ये मनु भाकरनं चांगली सुरुवात केली. परंतु, पिस्तूलमध्ये बिघाड झाल्यानंतर मनुचं लक्षं विचलित झालं आणि 575 गुणांसह ती क्वॉलिफाइंग राउंडमध्ये ती 12व्या क्रमांकावर आली. तर याच स्पर्धेत यशस्विनी देसवाल 574 गुणांसह 13व्या स्थानी होती. परंतु, अंतिम सामन्यात केवळ 8 खेळाडूंनाच संधी मिळणार होती. त्यामुळे मनु भाकर आणि यशस्विनी देसवाल या दोघींचही आव्हान क्वॉलिफाइंग राउंडमध्येच संपुष्टात आलं.
मनु भाकरनं पहिल्या राउंडमध्ये 98 गुणांसह दमदार सुरुवात केली होती. परंतु, त्यानंत तिच्या पिस्तूलमध्ये तात्रिक बिघाड झाल्यामुळे तिला पाच मिनिटांसाठी वाट पाहावी लागली. त्यानंतर तिचं लक्ष मात्र काहीसं विचलित झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, शेवटच्या राउंडमध्ये मनु भाकरनं वापसी केली, पण आपल्या शॉर्ट्समध्ये ती केवळ 8 गुण मिळवू शकली.
चीनची जियान रानशिंगने 587 गुणांसह ऑलिम्पिक रेकॉर्ड बनवला आणि क्वालिफाइंग राउंडमध्ये पहिलं स्थान पटकावलं. यूनानची अन्ना कोराक्की दुसरं आणि रुसी ऑलिम्पिक समितीची बी वितालिनानं तिसरं स्थान पटकावलं.
अद्याप मनु भाकरकडून पदाकाची अपेक्षा
दरम्यान, 19 वर्षीय मनु भाकरचं टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक पटकावण्याचं स्वप्न अद्याप संपुष्टात आलेलं नाही. मनु भाकर महिलांच्या 25 मीटर पिस्तून इव्हेंटमध्ये सहभागी होणार आहे. हा इव्हेंट 29 जुलै रोजी पार पडणार आहे. याव्यतिरिक्त ती सौरभ चौधरीसोबत 10 मीटर एअर पिस्तूलच्या मिश्रित संघ सामन्यातही खेळणार आहे. हा सामना उद्या होणार आहे.
टेनिसमध्ये सानिया मिर्झा आणि अंकिताची शानदार सुरुवात
टेनिसमध्ये मिश्र दुहेरीत पहिल्या सामन्यात भारताची सानिया मिर्झा आणि अंकिता रैनाच्या जोडीनं शानदार सुरुवात केली आहे. त्यांनी यूक्रेनच्या नादिया आणि ल्यूडमयलाविरुद्ध पहिला सेट 6-0 असा जिंकला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Tokyo Olympics 2020 LIVE : भारताची बॅडमिंटन स्टार खेळाडू पीव्ही सिंधुचा पहिला विजय