Lovlina Borgohain in Commonweath games : यंदा कॉमनवेल्थ गेम्स (Commonwealth Games 2022) खेळात बॉक्सिंग खेळात भारताची ऑलिम्पिक पदकविजेती बॉक्सर लवलिना बोर्गोहेन (Lovlina Borgohain) भारताचं प्रतिनिधित्त्व करेल. पण या स्पर्धेपूर्वीच लवलिनाने एक मोठा खुलासा करत तिचा मानसिक छळ सुरु असल्याचं सांगितलं आहे. 'मला पदक मिळवून देण्यात ज्या प्रशिक्षकांनी मोलाची मदत केली, त्यांना सतत बदललं जात आहे. कॉमनवेल्थ विलेजमध्ये देखील यायला देत नसून त्यांना सतत त्याठिकाणाहून बदलत असल्याने मला मोठ्या मानसिक त्रासाला सामोरं जावं लागत आहे.
लवलिनाने ट्वीटरवर पोस्ट करत ही सर्व माहिती दिली आहे. यावेळी तिने तिची प्रशिक्षक संध्या गुरुंगजी (Sandhya Gurung) हीला द्रोणाचार्य अवार्ड देखील मिळालं आहे. पण असं असतानाही माझ्या दोन्ही प्रशिक्षकांना ट्रेनिंगसाठी हजारदा हात जोडून विनंती केल्यानंतर उशिराने सोडलं जातं. या सर्वाचा माझ्या खेळावरही परिणाम होत आहे. स्पर्धेला 8 दिवस असताना असं सगळं होत असून याशिवाय माझ्या एका प्रशिक्षकाला भारतात पुन्हा पाठवण्यात आलं आहे. या सगळ्यानंतर मी खेळावर कसं फोकस करु हे कळत नाही. पण आशा आहे या साऱ्यानंतरही मी देशासाठी पदक मिळवून देईन.
लवलिनाच्या या पोस्टनंतर अनेक प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत असून काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनीही याबाबत पोस्ट करत योग्य त्या कारवाईची मागणी केली आहे.
लवलिनासह निखत भारताचं प्रतिनिधित्त्व करणार
यंदा कॉमनवेल्थ गेम्स (Commonwealth Games 2022) इंग्लंडच्या बर्मिंगहममध्ये 28 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान पार पडणार आहेत. या भव्य स्पर्धेसाठी बॉक्सिंग खेळात भारताची ऑलिम्पिक पदकविजेती बॉक्सर लवलिना बोर्गोहेन (Lovlina Borgohain) आणि बॉक्सर निखत जरीन (Nikhat Zareen) यांनी स्थान मिळवलं आहे. त्यामुळे या दोघेही या स्पर्धेत भारताचं नेतृत्त्व करणार असून पदकासाठी प्रयत्नांची शिकस्त करताना दिसतील. भारताची आघाडीची महिला बॉक्सर मेरी कोमने (Mary Kom) पायाला दुखापत झाल्यामुळे शुक्रवारी (10 जून) 48 किलो कॅटेगरीसाठीच्या ट्रायल्समधून माघार घेतली. ज्यानंतर आता लवलिना आणि निखतची निवड या स्पर्धेसाठी झाली आहे. कॉमनवेल्थ स्पर्धेसाठी पात्रता सामन्यांत निखतने 50 किलो वजनी गटात हरयाणाच्या मिनाक्षीला 7-0 ने मात देत विजय मिळवला. तर दुसरीकडे लवलिनाने रेल्वेकडून खेळणाऱ्या पुजाविरुद्ध दमदार विजय मिळवत कॉमनवेल्थ गेम्सचं तिकीट मिळवलं.
हे देखील वाचा-
- Commonwealth Games 2022 : खेळाडूंना मानसिक तणावाशी सामना करण्यासाठी ट्रेनिंग द्यायला हवी; कॉमनवेल्थचं तिकीट मिळाल्यानंतर निखत जरीनचं वक्तव्य
- Commonwealth Games 2022 : आगामी कॉमनवेल्थ गेम्ससाठी 'या' भारतीय महिला कुस्तीपटूंची निवड, इंग्लंडमध्ये रंगणार स्पर्धा
- Commonwealth Games 2022 : आगामी कॉमनवेल्थ गेम्सपूर्वी भारताला मोठा झटका, दिग्गज बॉक्सर मेरी कोमची माघार