Commonwealth Games 2022 : कॉमनवेल्थ गेम्स (Commonwealth Games 2022) स्पर्धेत बॉक्सिंगमध्ये भारताचं प्रतिनिधित्त्व करण्यासाठी लवलिना बोर्गोहेन (Lovlina Borgohain) आणि बॉक्सर निखत जरीन (Nikhat Zareen) या दोघींंना संधी मिळाली आहे. दरम्यान या भव्य स्पर्धेत एन्ट्रीनंतर अशाप्रकारच्या मोठ्या जागतिक स्पर्धांत खेळण्यासाठी मानसिक तणावाचा (Mental Pressure) सामना करण्याकरता विशेष ट्रेनिंग खेळाडूंना मिळायला हवं, असं निखतने म्हटलं आहे. इंडियन वुमन प्रेस कॉर्प्सच्या एका आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात निखतने हे वक्तव्य केलं आहे.


या कार्यक्रमात निखतला जेव्हा विचारण्यात आलं की, भारतीय खेळाडूंमध्ये कोणत्या गोष्टीची कमी आहे? त्यावेळी निखत उत्तर देताना म्हणाली, 'आपले भारतीय बॉक्सर्स खूप टँलेटेड आहेत. सर्वांकडे ताकत, चपळता, ऊर्जा आहे. पण जेव्हा जागतिक लेव्हलची स्पर्धा खेळायला खेळाडू जातात, तेव्हा ते मानसिक तणावाखाली असतात. त्यामुळे अशा तणावाशी सामना करण्यासाठी विशेष ट्रेनिंग खेळाडूंना द्यायला हवी'    


भारतीय खेळाडू कॉमनवेल्थही सर करणार का?


भारतीय बॅडमिंटन संघाने काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या थॉमस कपल्या अंतिम सामन्यात इंडोनेशियाला मात देत 73 वर्षात पहिल्यांदाच थॉमस कप जिंकला. यावेळी लक्ष्य सेन आणि किंदम्बी श्रीकांतने पुरुष एकेरीत विजय मिळवला. तर सात्त्विकसाईराज रंकिरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीने पुरुष दुहेरीत विजय मिळवत, 5 पैकी 3 सामने जिंकत कप मिळवला. त्याआधी मागील वर्षी पार पडलेल्या टोकियो ऑलिम्पिक्स (tokyo olympics 2021) स्पर्धेत भारताने दमदार कामगिरी केली. आजवरच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट कामगिरी भारतीय खेळाडूंनी करत 7 पदकं खिशात घातली. विशेष म्हणजे भालाफेकपटू नीरज चोप्राने यावेळी सुवर्णपदक जिंकलं. तर वेट लिफ्टिंगमध्ये मीराबाई चानूने रौप्य, पैलवान रवी दहियाने रौप्य, पैलवान बजरंग पुनियाने कांस्य पदक जिंकल. याशिवाय महिला बॉक्सर लवलिनाने कांस्य आणि बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने कांस्य पदक जिंकल. भारतीय हॉकी संघानेही कांस्य पदकावर यंदा नाव कोरलं. दरम्यान भारतीय खेळाडूंची आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील ही कामगिरी पाहता यंदा कॉमनवेल्थ गेम्सममध्येही भारत दमदार कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे.


हे देखील वाचा-