Aurangabad News: शिवसेना आणि शिंदे गटातील वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शिंदे यांच्यासोबत जाणाऱ्या आमदार खासदारांच्या यादीत सतत वाढ होत आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणारे कट्टर शिवसैनिकांची संख्या देखील मोठी आहे. दरम्यान शिंदे गटात सहभागी झालेल्या बंडखोर आमदारांमध्ये चर्चेत असलेल्या अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघातील अनेक शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे या शिवसैनिकांनी आपण उद्धव ठाकरेंच्या सोबत असल्याचे बाँडवर शपथपत्रही लिहून दिले आहे. 


आमदार अब्दुल सत्तार यांनी शिंदे गटाची वाट धरली आहे. मात्र त्यांच्या मतदारसंघातील कट्टर आणि जुने शिवसैनिकांनी मात्र अजूनही उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहण्याचा निर्णय घेतला आहे. तर आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा होताच या शिवसैनिकांमध्ये उत्साह संचाराल्याच पाहायला मिळत आहे. सत्तार यांचा मतदारसंघातील सोयगाव येथील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आम्ही उद्धव ठाकरेंच्या सोबत असल्याचे बाँडवर शपथपत्र लिहून दिले आहे. त्यामुळे शिंदे गटाला मोठा धक्का समजला जात आहे. 


Arjun Khotkar: अखेर अर्जुन खोतकर हे शिंदे गटात सामील?; दानवेंसोबतचा वादही मिटला


निवडणुकीच्या तोंडावर सत्तारांना धक्का!


शिवसेनेचे तालुका संघटक दिलीप मचे, माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीराम पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी बॉंड पेपर करून उद्धव ठाकरे यांच्याच पाठीशी असल्याचा करार करून दिला आहे. तर जिल्हा परिषदेच्या आमखेडा गटात या शिवसैनिकांनी शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ करत आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत भगवा फडकवणार असल्याचा दावा केला आहे. 


महत्वाच्या बातम्या...


Dhairyasheel Mane meets Eknath Shinde : शिवसैनिकांचा घरावर मोर्चा सुरु असताना धैर्यशील माने दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला 


Abdul Sattar: आदित्य ठाकरेंचं चॅलेंज अब्दुल सत्तारांनी स्वीकारले; मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी...


Aurangabad: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 31 जुलैला मराठवाड्यात; औरंगाबाद जिल्ह्याचा करणार दौरा