Commonwealth Games 2022 : आगामी कॉमनवेल्थ गेम्ससाठी (Commonwealth Games 2022) काही महिनेच शिल्लक असतानाच भारताला एक मोठा झटका बसला आहे. या महत्त्वाच्या स्पर्धेतून भारताची आघाडीची महिला बॉक्सर मेरी कोमने (Mary Kom) माघार घेतली आहे. पायाला दुखापत झाल्यामुळे शुक्रवारी (10 जून) मेरीने कॉमनवेल्थ गेम्सच्या 48 किलो कॅटेगरीतून ट्रायलमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.  तब्बल सहा वेळा विश्व चॅम्पियन असणारी मेरी कॉमनवेल्थ गेम्ससाठीच्या ट्रायलच्या सेमीफायनलमधील सामन्यात दुखापतग्रस्त झाली आहे.


मागील वेळी कॉमनवेल्थ गेम्समध्ये (Commonwealth Games 2018) सुवर्णपदक विजेत्या मेरीने ऐतिहासिक कामिगिरी केली होती. पण यंदा या 39 वर्षीय बॉक्सर मेरी यंदा मात्र स्पर्धेआधी ट्रायलच्या सामन्यातच जबर दुखापतग्रस्त झाली, ज्यामुळे तिला सामनाही पूर्ण करता आला नाही. विशेष म्हणजे कॉमनवेल्थ गेम्ससाठी मेरीने विश्व चॅम्पियनशिप आणि आशिया खेळातूनही माघार घेतली होती. मेरी कोमच्या माघार घेण्यामुळे आता हरियाणाची नीतू हिने इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये कॉमनवेल्थ गेम्ससाठी होणाऱ्या ट्रायलच्या फायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे.   



भारतीय खेळाडू कॉमनवेल्थही सर करणार का?


भारतीय बॅडमिंटन संघाने काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या थॉमस कपल्या अंतिम सामन्यात इंडोनेशियाला मात देत 73 वर्षात पहिल्यांदाच थॉमस कप जिंकला. यावेळी लक्ष्य सेन आणि किंदम्बी श्रीकांतने पुरुष एकेरीत विजय मिळवला. तर सात्त्विकसाईराज रंकिरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीने पुरुष दुहेरीत विजय मिळवत, 5 पैकी 3 सामने जिंकत कप मिळवला. त्याआधी मागील वर्षी पार पडलेल्या टोकियो ऑलिम्पिक्स (tokyo olympics 2021) स्पर्धेत भारताने दमदार कामगिरी केली. आजवरच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट कामगिरी भारतीय खेळाडूंनी करत 7 पदकं खिशात घातली. विशेष म्हणजे भालाफेकपटू नीरज चोप्राने यावेळी सुवर्णपदक जिंकलं. तर वेट लिफ्टिंगमध्ये मीराबाई चानूने रौप्य, पैलवान रवी दहियाने रौप्य, पैलवान बजरंग पुनियाने कांस्य पदक जिंकल. याशिवाय महिला बॉक्सर लवलिनाने कांस्य आणि बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने कांस्य पदक जिंकल. भारतीय हॉकी संघानेही कांस्य पदकावर यंदा नाव कोरलं. दरम्यान भारतीय खेळाडूंची आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील ही कामगिरी पाहता यंदा कॉमनवेल्थ गेम्सममध्येही भारत दमदार कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे.


हे देखील वाचा-