Shoaib Malik : भारताची दिग्गज टेनिसपटू सानिया मिर्झाच्या घटस्फोटाची चर्चा सुरु असतानाच पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत लग्न केले आहे. मलिकने ट्विटरवर पोस्ट करत तिसऱ्या लग्नाची घोषणा केली. दुसरीकडे, सानियाने काही दिवसांपूर्वी एक सूचक भाष्य करणारा मेसेज पोस्ट केला होता. ज्यामध्ये घटस्फोटाचा उल्लेख होता.


शोएब मलिकच्या अफेअरला कंटाळून सानियाचा घटस्फोटाचा अर्ज 


दरम्यान, पाकिस्तानी मीडियानुसार, क्रिकेटर शोएब मलिकपासून वेगळे झाल्यानंतर भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झाने 2022 च्या अखेरीस घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. जिओ न्यूजनुसार, 37 वर्षीय टेनिसपटू सानिया शोएब मलिकच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्समुळे खूश नव्हती. सुरुवातीला तोडगा काढण्याचा प्रयत्न केला, पण पतीच्या बाहेरख्यालीमुळे खूश नव्हती. शोएब मलिकचे नाव अनेक महिलांशी जोडले गेल्यावर घटस्फोटाचा अर्ज दाखल केला. मात्र, सानियाने अर्ज कोठे दाखल केला आणि त्यावर अद्याप निर्णय झाला आहे की नाही, याचा उल्लेख त्या अहवालांमध्ये करण्यात आलेला नाही.


शोएब मलिकच्या व्यवस्थापकाने दुजोरा दिला 


दुसरीकडे, 41 वर्षीय शोएबने अभिनेत्री सना जावेदसोबत तिसरे लग्न केल्याची घोषणा केली. या घोषणेनंतर लगेचच सना जावेदने तिचे इंस्टाग्राम बायो बदलून 'सना शोएब मलिक' असे केले. दरम्यान, मलिकचे व्यवस्थापक अर्सलान शाह यांनीही X ला या वृत्ताला दुजोरा दिला. शाह यांनी लिहिले की, आमचा लाडका सुपरस्टार शोएब मलिकने सना जाविदसोबत लग्न केलं आहे. आम्ही नवीन जोडप्याला आनंद आणि आनंदाने परिपूर्ण आयुष्यासाठी शुभेच्छा देतो.


शोएब मलिकचे कुटुंब दु:खी 


त्याचवेळी शोएबच्या कुटुंबातील एकही सदस्य या लग्नसोहळ्याला उपस्थित नव्हता. सानियासोबत ब्रेकअप झाल्याने नाराज असल्याचे सूत्रांनी सांगितले. मलिकचा मेहुणा इम्रान जफर म्हणाला की, त्यालाही सोशल मीडियाच्या माध्यमातून लग्नाची माहिती मिळाली. सनाच्या लग्नाला शोएबच्या कुटुंबातील कोणीही हजेरी लावली नसल्याची पुष्टी त्याने केली.


बऱ्याच दिवसांपासून अफेअर 


शोएबचे कुटुंब घटस्फोटाच्या बाजूने नसल्यामुळे वैवाहिक समस्या सोडवण्यासाठी 2022 च्या अखेरीस दोन्ही खेळाडूंचे कुटुंब दुबईला गेले होते. घटस्फोटानंतर शोएब मलिकचे कुटुंब खूप दुःखी होते आणि त्यांनी क्रिकेटरला त्यांच्या नात्यावर काम करण्यास सांगितले होते. त्याने सांगितले की, शोएब आणि सना दोघेही बऱ्याच दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये होते. असे असूनही, क्रिकेटरने अनेकवेळा अफवांचे खंडन केले होते. 


इतर महत्वाच्या बातम्या