Sania Mirza टेनिस स्टार सानिया मिर्झा (Sania Mirza) सध्या चर्चेत आहे. पाकिस्तानी क्रिकेट माजी कॅप्टन शोएब मलिकनं टेनिस स्टार सानिया मिर्झाला घटस्फोट दिल्याची चर्चा सुरु असतानाच थेट लग्नाची बातमी समोर आल्याने खळबळ उडाली आहे. सानिया मिर्झाच्या सोशल मीडियातील पोस्टनंतर स्टार कपलच्या घटस्फोटाच्या बातम्यांनी जोर पकडला होता. शोएब मलिकने तिसऱ्यांदा लग्न दुसऱ्या लग्नाच्या सना जावेदशी लग्नाची गाठ बांधली आहे. पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकसोबत लग्न करण्यापूर्वी सानिया मिर्झाचे नाव बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरसोबतही जोडले गेले होते.



सानियाचे शाहिदसोबत अफेअर असल्याची चर्चा होती 


सानिया आणि शाहिदच्या अफेअरची बरीच चर्चा झाली होती. शाहिद आणि सानिया एकमेकांना डेट करत असल्याची अफवा पसरली होती. मात्र, दोघांनीही त्यांच्या नात्याच्या वृत्ताला दुजोरा दिला नाही. पण जेव्हा सानिया मिर्झा करण जोहरच्या टॉक शो कॉफी विथ करणच्या सीझन 5 मध्ये आली तेव्हा तिने तिच्या आणि शाहिदच्या डेटिंगच्या बातम्यांवर प्रतिक्रिया दिली होती. 


करण जोहरने सानिया मिर्झाला विचारले होते की, हिंदी चित्रपटातील अभिनेत्यांनी तुला कधीच संपर्क केला नाही असे कसं? या प्रश्नावर सानिया मिर्झाने उत्तर दिले की, माझ्यासोबत असे कधीच घडलं नाही. सानियाच्या उत्तरावर करणने पुढे विचारले, तुमच्या आणि शाहिदबद्दलही चर्चा कानावर आली होती. त्याच्यात काही तथ्य होते का? यावर सानियाने अतिशय मजेशीर उत्तर दिले. ती म्हणाला होती की, मला आठवत नाही, खूप दिवस झाले आहेत. माझ्या बाबतीत असे काहीही झाले नाही कारण मी खूप प्रवास करते. 



सानियाला शाहिद कपूरला Kill करायचे होते


यानंतर, शोच्या रॅपिड फायर राऊंडमध्ये, जेव्हा सानिया मिर्झाला विचारण्यात आले की, रणबीर कपूर, रणवीर सिंह आणि शाहिद कपूरमध्ये तिला कोणासोबत लग्न करायला आवडेल आणि ती कोणाला Kill करेल? यावर सानिया म्हणाली होती, ती रणवीरसोबत हुकअप करेल, रणबीर कपूरशी लग्न करेलआणि शाहिद कपूरला Kill करेल. 


इतर महत्वाच्या बातम्या