मुंबई : ठाकरे गटाचं राज्यव्यापी अधिवेशन 22 आणि 23 जानेवारीला नाशिकमध्ये (Nashik News)  होणार आहे, अशी माहिती शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut)  दिली आहे.  तर नाशिकच्या काळाराम मंदिरात पंतप्रधानांनी आरती केली, पण सावरकरांच्या स्मारकावर त्यांना जावं वाटलं नाही, अशी देखील टीका राऊतांनी मोदींवर (PM Modi) केली आहे. ते मुंबईत पत्रकरांशी बोलत होते.


संजय राऊत म्हणाले, पंतप्रधान मोदी  नाशिकमध्ये येऊन काळाराम मंदिरात गेले. पूजा केली भव्य रॅली पण काढली. राजकीय आरती केली पण त्यांना भगूरच्या सावरकरांच्या स्मारकावर जावं वाटल नाही. त्यांना सावरकरांची आठवण झाली नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची आठवण झाली नाही पण उद्धव ठाकरे जातील. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या निवासस्थानी जाऊन अभिवादन करतील. आमच्यासाठी तो दिवस अत्यंत महत्वाचा आहे. नाशिकमध्ये येऊन सावरकरांना अभिवादन केलं नाही असे होऊ शकत नाही.


शिवसेनेच राज्यव्यापी अधिवेशन 22 आणि 23 तारखेला नाशिकमध्ये : संजय राऊत


शिवसेनेच राज्यव्यापी अधिवेशन 22 आणि 23 तारखेला नाशिकमध्ये सुरु होत आहे. 22  तारखेला काळाराम मंदिरात दर्शन पूजा आणि रामकुंडावर पूजा असा कार्यक्रम असेल. प्रत्यक्षात 23  तारखेला अधिवेशन असेल. साधारण 5.30  वाजता उद्धव ठाकरे काळाराम मंदिरात जातील. पावणेसात वाजता उद्धव ठाकरे गोदातीरावर जातील आणि आरती होईल. याआधी अनेकदा आम्ही शरयू तीरावर आरती केलीय पण यावेळी नाशिकमध्ये करू. अयोध्येनंतर रामायणात पंचवटीला महत्व आहे. म्हणून आम्ही नाशिक निवडलं आहे, असे संजय राऊत म्हणाले,  


गोल्फ मैदानात विराट अधिवेशन सभा : संजय राऊत


संजय राऊत म्हणाले,  हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानात म्हणजेच गोल्फ मैदानात विराट अधिवेशन सभा पार पडेल. जनता न्यायालय हा महाराष्ट्रातला आणि देशातला यशस्वी कार्यक्रम झाला. 23 तारखेला सकाळी नाशिकच्या डेमोक्रसी क्लबमध्ये शिवसेनेची राज्यव्यापी शिबीर पार पडेल. प्रमुख पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन होईल आणि काही ठराव मांडले जातील. जनता न्यायालयात या देशातली न्यायव्यवस्था, केंद्रीय यंत्रणा यांना उघडे पाडले आहे.


मुख्यमंत्री तुकड्यावर जगत आहेत : संजय राऊत


मुख्यमंत्री स्वतःला शिवसैनिक समजतात तर त्यांना अक्कल नाही का ? त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून हे सगळं होते हे त्यांना कळत नाही का ?तिकडे हेमंत सोरेन असतील किंवा केजरीवाल असतील त्यांनाही इंडिया आघाडीतून बाहेर पडा यासाठी दबाव टाकण्यात येतोय. मुख्यमंत्री तुकड्यावर जगत आहेत, असेही संजय राऊत म्हणाले.



 


हे ही वाचा :


मराठा आरक्षणासाठी कूच केलेल्या मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांकडून अजूनही परवानगी नाही!