New Zealand vs Pakistan : पाकिस्तानला पावसाने तारले, पण चारशे करूनही न्यूझीलंडच्या छातीत कळ आली! वर्ल्डकपमध्ये चुरस कायम
New Zealand vs Pakistan : पाकिस्तानच्या या विजयाचा हिरो ठरला फखर जमान ठरला. फखर जमानने केवळ 81 चेंडूत 126 धावांची ऐतिहासिक खेळी केली.
बंगळूर : दोनवेळा पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यात पाकिस्तानने डकवर्थ लुईसने न्यूझीलंडचा 21 धावांनी पराभव केला. पाकिस्तानच्या या विजयाचा हिरो ठरला फखर जमान ठरला. फखर जमानने केवळ 81 चेंडूत 126 धावांची ऐतिहासिक खेळी केली. फखर जमानच्या झंझावाती खेळीसमोर न्यूझीलंडची मोठी धावसंख्या बटू वाटत होती. मात्र, पावसाने पाकिस्तानच्या अडचणीही कमी केल्या. फखरने आपल्या शतकी खेळीत 8 चौकार आणि 11 षटकार मारले. तर बाबर आझम ६६ धावांवर नाबाद राहिला.फखर जमानच्या झंझावाती खेळीसमोर न्यूझीलंडची मोठी धावसंख्या छोटी वाटत होती. मात्र, पावसाने पाकिस्तानच्या अडचणीही कमी केल्या. 2023 विश्वचषकातील 35 व्या सामन्यात पाकिस्तानने न्यूझीलंडचा 21 धावांनी पराभव केला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 50 षटकांत 6 बाद 401 धावा केल्या. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या डावात पावसाने दोनदा हस्तक्षेप केला.
डकवर्थ-लुईस नियमानुसार, पाकिस्तानला 25.3 षटकात एक विकेट गमावून 179 धावा करायच्या होत्या, परंतु त्याची धावसंख्या 200 धावा होती. त्यामुळे पाकिस्तानने 21 धावांनी विजय मिळवला. 402 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानने 4 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतलेल्या अब्दुल्ला शफीकच्या रूपाने दुसऱ्याच षटकात पहिली विकेट गमावली. यानंतर दुसरे सलामीवीर फखर जमान आणि बाबर आझम यांनी मिळून अशी खेळी खेळायला सुरुवात केली, ज्याचे उत्तर कोणत्याही किवी गोलंदाजाकडे नव्हते.
वेगवान धावगतीने प्रवास करत असलेल्या पाकिस्तानला पहिल्यांदा 22व्या षटकात पावसाने त्रास दिला. त्यानंतर काही वेळाने खेळ सुरू झाला आणि पाकिस्तानला 41 षटकांत 342 धावांचे लक्ष्य देण्यात आले. म्हणजेच पुढच्या 19.3 षटकात पाकिस्तान संघाला 182 धावा करायच्या होत्या. लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा डाव काही काळच टिकू शकला आणि 26व्या षटकात पावसाने पुन्हा एकदा दणका दिला.
यादरम्यान पाकिस्तान संघाने 25.3 षटकात केवळ 1 गडी गमावून 200 धावा केल्या होत्या. संघाचा सलामीवीर फखर जमानने 155.56 च्या जबरदस्त स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना नाबाद 126 धावांपर्यंत मजल मारली होती. फखरने 8 चौकार आणि 11 षटकार मारले. तर कर्णधार बाबरने आपला डाव पुढे नेत 63 चेंडूत नाबाद 66 धावा केल्या, ज्यात 6 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता.
न्यूझीलंडच्या फलंदाजांचा डाव व्यर्थ गेला
फखर जमानच्या तुफान पावसाने न्यूझीलंडच्या फलंदाजांची दमदार खेळी पूर्णपणे उद्ध्वस्त केली. संघासाठी युवा अष्टपैलू रविच रवींद्रने 94 चेंडूंत 15 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 108 धावा करत स्पर्धेतील तिसरे शतक झळकावले. याशिवाय कर्णधार केन विल्यमसनने 10 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 95 धावा केल्या होत्या.
दोन्ही संघाच्या गोलंदाजांना चांगलाच फटका बसला
प्रथम न्यूझीलंडने पाकिस्तानच्या गंभीरला नमवले. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदीने 0/90, हारिस रौफने 1/85 आणि हसन अलीने 10 षटकात 1/82 बळी घेतले. मात्र, दरम्यान वसीम ज्युनियरने चांगली गोलंदाजी करत 10 षटकात 60 धावा देत 3 बळी घेतले.
तर न्यूझीलंडकडून 25.3 षटकांत ट्रेंट बोल्टने 6 षटकांत 50 धावा, ईश सोधीने 4 षटकांत 44 धावा, ग्लेन फिलिप्सने 5 षटकांत 42 आणि सँटनरने 5 षटकांत 35 धावा दिल्या. मात्र, दरम्यान, टीम साऊदी किफायतशीर राहिला आणि त्याने 5 षटकात केवळ 27 धावा देत 1 बळी घेतला.