नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट फॅन्स आजचा दिवस कदाचित कधीच विसरणार नाहीत. गेल्यावर्षी आजच्याच दिवशी भारतीय क्रिकट फॅन्सची मोठी निराशा झाली होती. कोट्यवधी भारतीयांचं वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न महेंद्रसिंह धोनीच्या एका रनआऊटमुळे भंगलं होतं. न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात भारताचा पराभव झाला होता.


गेल्यावर्षी 9 जुलै रोजी हा सामना खेळवला गेला होता. मात्र पावसामुळे सतत व्यत्यय आल्याने सामना 10 जुलैला रिझर्व्ह डेला खेळवला गेला होता. मॅन्चेस्टरच्या ओल्ड ट्रेफर्ड मैदानावर हा सामना झाला. न्यूझीलंडने टॉस जिंकून प्रथम बॅटिंगचा निर्णय घेतला होता. पहिल्यांदा बॅटिंगला आलेल्या न्यूझीलंडने 50 ओव्हरमध्ये 239 धावा केल्या. यानंतर 240 धावांचा पाठलाग करायला आलेली टीम इंडिया 49.3 ओव्हरमध्ये 221 धावांवर ऑल आऊट झाली. या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा 16 धावांनी पराभव केला होता.





एक वर्ष पूर्ण झालं म्हणून आयसीसीने एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. धोनीचं रनआऊट होणं हा या सेमीफायनल सामन्यातील गेम चेजिंग क्षण होता. व्हिडीओ पाहून भारतीय फॅन्सनी अनेक इमोशनल कमेन्ट केल्या आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत धोनी कसा रनआऊन झाला हे दाखवण्यात आलं आहे. आतापर्यंत पाच लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.


या सामन्यात रविंद्र जाडेजाने 77 धावा तर धोनीने 50 धावा केल्या होत्या. जाडेजासोबत भागीदारी करत धोनीने टीम इंडियाला विजयाच्या उंबरठ्यापर्यंत आणलं होतं. मात्र धोनी रनआऊट झाला आणि भारताचा विजय हातून निसटला.


संबंधित बातम्या