एक्स्प्लोर
Advertisement
न्यूयॉर्क टाईम्सचं एप्रिल फूल, सेहवाग अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या स्पर्धेत
मुंबई : टीम इंडियाचा माजी धडाकेबाज फलंदाज क्रिकेटच्या मैदानासोबतच मैदानाबाहेरही आपल्या ट्वीटमुळे चौकार, षटकारांची आतिशबाजी करतो. पण आता त्याचं नाव अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या स्पर्धेसाठी चर्चिलं जात असल्याचं जाणून अनेकांना अश्चर्याचा धक्का बसला असेल.
पण याबातच्या एका बातमीचं कात्रण वीरुनं आपल्या ट्विटर अकाऊंटवर 1 एप्रिल रोजी पोस्ट केलं आहे. या कात्रणात सेहवागचं नाव अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या स्पर्धेत असल्याचं म्हणलं आहे. तसेच या बातमी खाली लेखकाचं नाव स्टिफन स्मिथ असं आहे. विशेष म्हणजे, या कात्रणावर अमेरिकेतलं प्रसिद्ध 'न्यूयॉर्क टाईम्स'चं नाव आहे.
सेहवागने पोस्ट केलेल्या 'न्यूयॉर्क टाईम्स'च्या कात्रणात म्हणलंय की, ''सेहवागचं नाव अमेरिकेच्या पुढील राष्ट्राध्यक्ष पदाच्या स्पर्धेत आहे. यासाठी तो नेहमी अमेरिकेत येतो, आणि सातत्याने तो ट्रम्प सरकारच्या संपर्कात आहे.'' या वृत्तात पुढं म्हणलंय की, ''अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, आणि माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा विरेंद्र सेहवागचे चाहते आहेत. या दोघांचेही सेहवागला राष्ट्रध्यक्षपदाची जबाबदारी देण्यावर एकमत झालं आहे. विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिका दौऱ्यावेळीही ट्रम्प मोदींसोबत याविषयावर चर्चा करणार,'' असल्याचं यामध्ये म्हणलंय. सेहवागने पोस्ट केलेल्या या ट्वीटला त्याच्या चाहत्यांनीही डोक्यावर घेतलं आहे. वीरुच्या या पोस्टवर कमेंटसचा पाऊस पडत आहे.Hahaha ! pic.twitter.com/xyvzQV1Ug8
— Virender Sehwag (@virendersehwag) April 1, 2017
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्रिकेट
नाशिक
निवडणूक
Advertisement