एक्स्प्लोर
Advertisement
इंग्लंडमध्ये भारतीय खेळाडूंना खाण्यासाठी बीफ, ट्विटरवर ट्रोलिंग
भारतीय खेळाडूंच्या मेन्यूमध्ये खाण्यासाठी जे पदार्थ होते, त्यावरुन आता नवा वाद सुरु झाला आहे. तिसऱ्या दिवसासाठी भारतीय खेळाडूंच्या खाण्यामध्ये बीफचाही समावेश होता.
मुंबई : इंग्लंडमधील लॉर्ड्सवर सुरु असलेल्या कसोटीत भारतीय संघ पहिल्या डावात 107 धावांवर गारद झाला. तर दुसरीकडे भारतीय खेळाडूंच्या मेन्यूमध्ये खाण्यासाठी जे पदार्थ होते, त्यावरुन आता नवा वाद सुरु झाला आहे.
तिसऱ्या दिवसासाठी भारतीय खेळाडूंच्या खाण्यामध्ये बीफचाही समावेश होता. बीसीसीआयने मेन्यूचा फोटो ट्विटरवर शेअर केला. हा फोटो पाहताच बीसीसीआयला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं. ब्रेज्ड बीफ पास्ता या पदार्थावरुन बीसीसीआयवर टीका करण्यात आली.
लॉर्ड्सवर सुरु असलेल्या कसोटीत जेवणात जो मेन्यू असतो, त्याचा फोटो बीसीसीआयकडून दररोज शेअर केला जातो. पहिल्या दिवशी सूप, चिकन लसाने, स्टफ्ड लँब, चिकन टिक्का करी, पनीर टिक्का असे पदार्थ होते. तर दुसऱ्या दिवशीही विविध पदार्थ होते. मात्र तिसऱ्या दिवशीच्या पदार्थांवरुन नवा वाद सुरु झाला.
A well earned Lunch for #TeamIndia.
You prefer? #ENGvIND pic.twitter.com/QFqcJyjB5J — BCCI (@BCCI) August 11, 2018
How beef can make any person anti national?
— NEWRAG (@RealAnuragOff) August 11, 2018
kohli eats beef too.. besides the menu is created by the english team... their whole squad eats beef
— The official John (@OfficialJohn95) August 11, 2018
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
विश्व
राजकारण
जळगाव
Advertisement