Paavo Nurmi Games Neeraj Chopra Gold: गोल्डन बॉय नीरज चोप्राने (Neeraj Chopra) पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी जबरदस्त फॉर्म दाखवला. नीरज चोप्राने पावो नुर्मी गेम्समध्ये (Paavo Nurmi Games) सुवर्ण जिंकले. फिनलंडमधील तुर्कू येथे झालेल्या पावो नूरमी गेम्समध्ये नीरजने तिसऱ्या प्रयत्नात 85.97 मीटर भालाफेक करून सुवर्णपदक जिंकले. नीरज चोप्राने तिसऱ्या प्रयत्नात आपला सर्वोत्तम थ्रो फेकला. ऑलिम्पिकपूर्वी आपला फॉर्म चांगला असल्याचे नीरज चोप्राने दाखवून दिले आहे.


फिनलंडचा टोनी केरानेन या स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकावर राहिला आणि त्याने 84.19 मीटर फेक करून रौप्यपदक जिंकले. फिनलंडच्या ऑलिव्हर हेनलँडरने 83.96 मीटरवर भालाफेक करून तिसरे स्थान पटकावत कांस्यपदक जिंकले. नीरज चांगली सुरुवात केल्यानंतर मागे पडला होता. त्याने पहिल्याच प्रयत्नात 83.62 असा थ्रो केला. यानंतर दुसऱ्या प्रयत्नात तो केवळ 83.45 मीटर थ्रो करू शकला आणि तो ऑलिव्हर हेनलँडरपेक्षा मागे राहिला. 


ऑलिव्हरने दुसऱ्या प्रयत्नात 83.96 थ्रो केला होता. त्यानंतर तिसऱ्या प्रयत्नात नीरज त्याच्या पुढे गेला आणि तोही त्याचा सर्वोत्तम थ्रो ठरला. भालाफेक करणाऱ्यांमध्ये नीरज चोप्रा हा भारतीय स्टार एकमेव खेळाडू होता ज्याने भालाफेक करताना 85 मीटरचा टप्पा ओलांडला होता. तिसऱ्या थ्रोनंतर नीरजचे उरलेले थ्रो खूपच कमकुवत होते. चौथ्या प्रयत्नात तो केवळ 82.21 मीटरवर थ्रो करू शकला. मात्र त्याने तिसऱ्या थ्रोने आघाडी घेतली. चौथ्यानंतर नीरजचा पाचवा प्रयत्न फाऊल झाला. त्यानंतर सहाव्या आणि शेवटच्या प्रयत्नात नीरजने 82.97 मीटरचा थ्रो केला.






नीरजचे सहाही प्रयत्न


पहिला प्रयत्न: 83.62 मीटर
दुसरा प्रयत्न: 83.45 मीटर
तिसरा प्रयत्न: 85.97 मीटर
चौथा प्रयत्न: 82.21 मीटर
पाचवा प्रयत्न: फाऊल
सहावा प्रयत्न: 82.97 मीटर
सर्व 8 खेळाडूंचे सर्वोत्तम थ्रो


नीरज चोप्रा (भारत) – 88.36 मीटर
टोनी केरानेन (फिनलंड) – 84.19 मीटर
ऑलिव्हर हेलँडर (फिनलंड) – 83.96 मीटर
अँडरसन पीटर्स (ग्रेनाडा) - 82.58 मीटर
एंड्रियन मार्डारे (मोल्दोव्हा) – 82.19 मीटर
केशोर्न वॉलकॉट (त्रिनिदाद) – 81.93 मीटर
मॅक्स डेहनिंग (जर्मनी) – 79.84 मीटर
लस्सी अटेलेटालो (फिनलंड)


संबंधित बातम्या:


Kane Williamson Central Contract: केन विल्यमसनने कर्णधारपद सोडले; न्यूझीलंड बोर्डाची ऑफरही नाकारली, नेमकं काय घडलं?, जाणून घ्या


Net Worth Of Gautam Gambhir: क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही कमाईत चौकार-षटकार; गौतम गंभीरची संपत्ती किती?


T20 World Cup 2024: 'दीवाली हो या होली, अनुष्का....'; भर मैदानात प्रेक्षकांच्या घोषणा, विराट कोहलीने काय केलं?, Video