एक्स्प्लोर

India Tour Of West Indies : 'या' कारणांमुळे धोनीला विश्रांती मिळण्याची शक्यता

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची निवड करण्यासाठी 19 जुलै रोजी निवड समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. ही बैठक आता 20 जुलै रोजी होण्याची शक्यता आहे.

मुंबई : वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची निवड करण्यासाठी 19 जुलै रोजी निवड समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. ही बैठक आता 20 जुलै रोजी होण्याची शक्यता आहे. या बैठकीनंतर बीसीसीआयकडून एकदिवसीय आणि टी20 मालिकेसाठीच्या भारतीय संघाची घोषणा होऊ शकते. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार विराट कोहली संघाच्या कर्णधारपदावर कायम राहील. तर माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीला या मालिकेत आराम दिला जाण्याची शक्यता आहे. धोनीच्या अंगठ्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे धोनीला आराम दिला जाणार आहे. दरम्यान, धोनी सध्या खराब फॉर्ममध्ये असल्यामुळे त्याला आराम दिला जाणार असल्याच्या अफवा पसरल्या आहेत. परंतु या अफवा खोट्या असून धोनीची दुखापत आणि सातत्याने खेळत असल्यामुळे आलेला थकवा या कारणांमुळे त्याला आराम दिला जाणार आहे. जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह याला एकदिवसीय आणि टी20 मालिकेसाठी विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. तसेच सलामीवीर शिखर धवन अंगठ्याच्या दुखापतीमधून सावरलेला नाही. त्यामुळे या मालिकेत त्यालादेखील आराम दिला जाणार आहे. या दुखापतीमुळेच शिखरला विश्वचषक स्पर्धा अर्ध्यावर सोडून मायदेशी परतावे लागले होते. निवृत्तीबाबत धोनी म्हणतो... अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याच्या फिटनेसबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. आयपीएल संपल्यापासून तो त्याच्या फिटनेसशी झुंजतोय. त्याचबरोबर विश्वचषक स्पर्धेतील खराब प्रदर्शनानंतर केदार जाधव आणि दिनेश कार्तिक या दोघांना डच्चू दिला जाणार आहे. MS Dhoni Retirement : धोनीच्या अखेरच्या सामन्याविषयी बीसीसीआयच्या अधिकाऱ्याचं भाकित दरम्यान, आयपीएल आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर या दोन नव्या खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता आहे. 3 ऑगस्टपासून वेस्ट इंडिज दौऱ्याला सुरुवात होणार आहे. पाहा व्हिडीओ : धोनी निवृत्ती केव्हा घेणार?  महेंद्रसिंह धोनी भाजपमध्ये प्रवेश करणार? भाजप नेत्याचा दावा खरा? | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget