एक्स्प्लोर

... तेव्हा धोनीने सांगितलं होतं, ही चूक परत करु नको : पंड्या

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या त्या सामन्यात आपल्याला माजी कर्णधार आणि टीम इंडियाचा विकेटकीपर महेंद्रसिंह धोनीने मदत केली, असं तो म्हणाला.

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून टीम इंडियाचा ऑलराऊंडर म्हणून ओळख मिळवलेला खेळाडू हार्दिक पंड्याने त्याच्या पदार्पणाच्या सामन्यातील काही आठवणींना उजाळा दिला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या त्या सामन्यात आपल्याला माजी कर्णधार आणि टीम इंडियाचा विकेटकीपर महेंद्रसिंह धोनीने मदत केली, असं तो म्हणाला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पदार्पणाच्या सामन्यात दबावात असताना धोनीने जवळ येऊन समज दिली. त्यानंतर शांतपणे खेळ केला आणि स्वतःमध्ये बदल घडवला, असं पंड्याने सांगितलं. एका वेब सीरिजदरम्यान बोलताना त्याने हा किस्सा सांगितला. आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील पहिल्याच षटकात पंड्याने 21 धावा दिल्या होत्या. शिवाय ख्रिस लीनसोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी त्याला आयसीसीच्या आचारसंहितेचं उल्लंघन केल्यामुळे समजही देण्यात आली होती. ''तो क्षण एका वाईट स्वप्नासारखा होता. एका षटकात 21 धावा दिल्यानंतर तेव्हा काहीही समजत नव्हतं. मात्र धोनी जवळ आला आणि 'आणखी एक ओव्हर टाकशील का?' विचारलं. 1.1 षटकानंतर 28 धावा दिल्या होत्या. पण त्यानंतरच्या षटकांमध्ये केवळ 7 ते 8 धावा दिल्या. त्यानंतरही धोनी काहीही म्हणाला नाही. धोनी फक्त एवढंच म्हणाला की, 'एका षटकानंतर तू चांगली गोलंदाजी करशील हे मला माहित होतं'', अशी आठवण पंड्याने सांगितली. ''ख्रिस लीनला बाद केल्यानंतर प्रचंड उत्साहात होतो आणि सेलिब्रेशन करत होतो. मात्र धोनी म्हणाला, की 'तू हे अखेरचं करत आहेस. पुन्हा असं करशील तर तुला दंड होईल आणि खेळण्याची संधी मिळणार नाही'', असंही पंड्याने सांगितलं. ''शिधर धवनमुळे हेअर स्टाईल बदलावी लागली'' हेअरस्टाईलबाबतही पंड्याला प्रश्न विचारण्यात आला. ''शिखर धवनमुळे ही हेअरस्टाईल करावी लागली, असं त्याने सांगितलं. शिखरला थोडेसे केस कापायला सांगितले होते, मात्र त्याने जास्त कापले. त्यामुळे अशी हेअरस्टाईल करावी लागली'', असा किस्साही पंड्याने शेअर केला. 'ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स' या वेब सीरिजमध्ये अनेक क्रिकेटपटूंनी हजेरी लावली आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीही या शोमध्ये आला होता.

महत्त्वाच्या बातम्या

Who Is Subhadeep Ghosh : कधीही खेळला नाही आंतरराष्ट्रीय सामना, आता बनणार टीम इंडियाचा फील्डिंग कोच; कोण आहे शुभदीप घोष?
कधीही खेळला नाही आंतरराष्ट्रीय सामना, आता बनणार टीम इंडियाचा फील्डिंग कोच; कोण आहे शुभदीप घोष?
क्रिकेट इतिहासातील सर्वात विचित्र OUT; टिचकी वाजवली अन् अंपायर फसवला, इंग्लंडमध्ये सामन्यात असा प्रकार घडला की जगभरात VIDEO व्हायरल
क्रिकेट इतिहासातील सर्वात विचित्र OUT; टिचकी वाजवली अन् अंपायर फसवला, इंग्लंडमध्ये सामन्यात असा प्रकार घडला की जगभरात VIDEO व्हायरल
Team India Coach News : रायन टेन डोशेटचा राजीनामा; आता गौतम गंभीर अन् अजित आगरकरांच्या खुर्चीचं काय होणार? BCCI च्या पुढच्या निर्णयाकडे साऱ्या क्रिकेटविश्वाचं लक्ष
रायन टेन डोशेटचा राजीनामा; आता गौतम गंभीर अन् अजित आगरकरांच्या खुर्चीचं काय होणार? BCCI च्या पुढच्या निर्णयाकडे साऱ्या क्रिकेटविश्वाचं लक्ष
Ryan Ten Doeschate News : भारतीय क्रिकेटला हादरवणारी एक्झिट! गौतम गंभीरचा सर्वात विश्वासू साथीदाराने अचानक दिला राजीनामा, थेट आयपीएलच्या बड्या टीमचा हात धरला
भारतीय क्रिकेटला हादरवणारी एक्झिट! गौतम गंभीरचा सर्वात विश्वासू साथीदाराने अचानक दिला राजीनामा, थेट आयपीएलच्या बड्या टीमचा हात धरला

व्हिडीओ

Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident Case : आमचा संयम सुटत चाललाय, आम्हाला उत्तर पाहिजे
Allegations Against Mangesh Jagtap Baramati: रिसॉर्ट बूक केलं, तारीख काढली, मला बघताच पळतो...; मंगेश जगताप यांच्यावर गंभीर आरोप, राष्ट्रवादीतील तरुणी थेट जिल्हा परिषदेच्या सभेत पेट्रोल घेऊन घुसली, पुण्यात खळबळ!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याचा दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याचा दाव्याने खळबळ
L&T Q1 Results: एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जुलै 2026 | मंगळवार
नागपुरात पावसाची जोरदार एंट्री, उद्या शाळांना सुट्टी; विदर्भात पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
नागपुरात पावसाची जोरदार एंट्री, उद्या शाळांना सुट्टी; विदर्भात पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
RBI Gold Reserve: रिझर्व्ह बँकेकडे सोन्याचा किती साठा? केंद्र सरकारकडून राज्यसभेत आकडेवारी सादर; सोने चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण
रिझर्व्ह बँकेकडे सोन्याचा किती साठा? केंद्र सरकारकडून राज्यसभेत आकडेवारी सादर
Priyanka Gandhi : लाज वाटायला पाहिजे तिथे निर्लज्जपणे धर्मेंद्र प्रधानांचं स्वागत केलं गेलं, विद्यार्थ्यांवर लाठीचार्जचा आदेश कुणी दिला? प्रियंका गांधींचा संतप्त सवाल
लाज वाटायला पाहिजे तिथे निर्लज्जपणे धर्मेंद्र प्रधानांचं स्वागत केलं गेलं, विद्यार्थ्यांवर लाठीचार्जचा आदेश कुणी दिला? प्रियंका गांधींचा संतप्त सवाल
Embed widget