Monty Panesar on Laal Singh Chaddha: बॉलिवूडचा स्टार अभिनेता आमिर खान (Aamir Khan) आणि करिना कपूर (Kareena Kapoor) यांचा लाल सिंह चड्ढा (Laal Singh Chaddha) आज प्रदर्शित झालाय. या चित्रपटाचा ट्रेलर समोर आल्यापासून हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकलाय. एवढेच नव्हे तर, सोशल मीडियावर या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचा ट्रेंड सुरू आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर इंग्लंडचा माजी क्रिकेटर मॉन्टी पानेसरही (Monty Panesar) संतापला आहे.
'लाल सिंह चड्ढा' हा 1994 साली आलेल्या 'फॉरेस्ट गंप' या हॉलिवूड चित्रपटाचा रिमेक आहे. ज्यामध्ये एक कमी आयक्यू असलेली व्यक्ती यूएस आर्मीमध्ये प्रवेश करतो. व्हिएतनाम युद्धाची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी अमेरिकन सैन्य कमी आयक्यू असलेल्या व्यक्तीला सैन्यात भरती करत असल्यानं हॉलिवूड चित्रपटाला अर्थ प्राप्त झाला असल्याचे पनेसरनं म्हटलंय.
ट्वीट-
पानेसर काय म्हणाला?
पानेसरनं ट्वीट लिहिलं आहे की, चित्रपटात शीख आणि भारतीय लष्कराचा अपमान करण्यात आलाय, या ट्विटमध्ये पानेसरनं #BoycottLalSinghChadda हॅशटॅग देखील वापरला आहे. पानेसर हे स्वतः शीख असून त्यांचे पालक भारतीय आहेत. पानेसरनं इंग्लंडकडून 50 कसोटी आणि 26 एकदिवसीय सामने खेळले आहेत. यादरम्यान, त्यानं दोन्ही फॉरमॅटमध्ये अनुक्रमे 167 आणि 24 विकेट्स घेतल्या आहेत.
पहिल्या दिवशी 12-14 कोटी कमाई करण्याची शक्यता
आमिर खानच्या लाल सिंह चड्ढा या चित्रपटाच्या कमाईबाबत असा अंदाज वर्तवला जात आहे की, चित्रपट पहिल्या दिवशी फारशी कमाई करणार नाही. चित्रपट समीक्षक आणि तज्ज्ञांच्या मते हा चित्रपट पहिल्या दिवशी 12-14 कोटींची कमाई करू शकतो. लाल सिंह चड्ढा हा चित्रपट बनवण्यासाठी निर्मात्यांनी 180 खर्च केले आहेत.
हे देखील वाचा-