IND vs ZIM: इंग्लंड आणि वेस्टइंडीजविरुद्ध दमदार प्रदर्शन केल्यानंतर भारतीय संघ झिम्बॉवे दौऱ्यावर (India's Tour of Zimbabwe) जाणार आहे. या दौऱ्यात भारत आणि झिम्बॉवे विरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना 18 ऑगस्ट रोजी खेळला जाणार आहे. यातच भारताचा स्टार गोलंदाज दीपक चहर (Deepak Chahar) दुखापतीतून सावरला असून लवकरच तो भारतीय संघात पुनरागमन करण्याची शक्यता आहे.
जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल दुखापतींमुळं आशिया चषकात खेळू शकणार नाहीत. भुवी व्यतिरिक्त अर्शदीप सिंह आणि आवेश खान यांना आशिया चषकासाठी भारतीय संघात स्थान मिळालं आहं. तर दीपक चहर यांना स्टँडबाय ठेवण्यात आलं आहे. तसेच येत्या 18 ऑगस्ट पासून सुरू होणाऱ्या झिम्बॉवेविरुद्ध एकदिवसीय मालिकेत दीपक चहरची निवड करण्यात आलीय. परंतु, त्याला प्लेईंग इलेव्हन मध्ये खेळण्याची संधी मिळणार की नाही? हे काही दिवसांत स्पष्ट होईल.
दीपक चहरच्या दुखपतीबाबत शंका
बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, निवड सिमितीला दीपक चहरत्या दुखापतीबाबत शंका आहे. दीपक चहर गेल्या सहा महिन्यात दुखापतग्रस्त आहे. आता तो झिम्बॉवेविरुद्ध एकदिवसीय मालिकेतून भारतीय संघात पुनरागमन करण्याची शक्यता आहे. दीपक चहरला फिटनेस आणि फॉर्म सिद्ध करता आला तर त्याची आशिया चषकासाठी भारतीय संघात स्थान मिळेल.
निवड समितीचं नेमकं म्हणणं आहे?
निवड समितीच्या एका सदस्याने सांगितले की, "दुखापतीतून पुनरागमन करणाऱ्या खेळाडूला तुम्ही थेट आशिया चषकात संघात स्थान देऊ शकत नाही. अशा खेळाडूला आधी आणखी एक संधी द्यायला हवी. दीपकला झिम्बाब्वे मालिकेत संधी आहे. तेथे त्याने चांगली कामगिरी केल्यास आशिया चषकासाठी त्याच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो."
हे देखील वाचा-