CWG 2022: इंग्लंडच्या (England) बर्मिंगहॅम (Birmingham) येथे पार पडलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेतील 22 व्या हंगामात (Commonwealth Games 2022) भारताची अचंता शरथ कमल आणि श्रीजा अकुला (Sreeja Akula- Sharath Kamal Achanta) यांनी रविवारी (7 ऑगस्ट 2022) टेबल टेनिसच्या मिश्र दुहेरीत भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं. या स्पर्धेत दमदार कामगिरी करून श्रीजा अकुला बुधवारी भारतात परतली. त्यावेळी हैदराबादच्या विमानतळावर तिचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं.
तेलंगणाच्या क्रिडामंत्र्यांकडून स्वागत
कॉमनवेल्थ क्रिडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यानंतर प्रथमच हैदराबादच्या शमशाबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या श्रीजा अकुलाचं तेलंगणाचं क्रीडा मंत्री व्ही श्रीनिवास गौड यांनी जंगी स्वागत केलं.
ट्वीट-
सुवर्णपदक जिंकल्यानंतर श्रीजा अकुला काय म्हणाली?
“भारतासाठी आंतरराष्ट्रीय पदक जिंकल्यामुळं मी माझ्या यशाबद्दल खूप आनंदी आहे. आमच्या असोसिएशनला मदत केल्याबद्दल मी सीएम केसीआर, केटीआर आणि क्रीडा मंत्री यांची खूप आभारी आहे. त्यांच्या मदतीमुळंच मला यश मिळालंय. मला प्रशिक्षण देणाऱ्या तेलंगणा सरकार आणि माझ्या प्रशिक्षकाची मी आभार आहे."
अचंता- श्रीजा जोडीचा मलेशियावर विजय
बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ स्पर्धेतील टेबल टेनिसच्या मिश्र दुहेरी प्रकारात अचंता शरथ कमल आणि श्रीजा अकुला यांनी भारताला सुवर्णपदक जिंकून दिलं होतं. अचंता-श्रीजा जोडीने मलेशियाच्या चुंग जावेन आणि लीन कारेन यांचा 11-4, 9-11, 11-5, 11-6 असा पराभव केला.
कॉमनवेल्थ स्पर्धेतील श्रीजाचं पहिलं सुवर्णपदक
शरथ कमलचं त्याच्या कारकिर्दीतील मिश्र दुहेरी प्रकारातील हे पहिलं सुवर्णपदक ठरलं आहे. तर, कॉमनवेल्थ स्पर्धेत पहिल्यांदाच सहभागी झालेल्या 24 वर्षीय श्रीजाचं देखील हे पहिलंच पदक ठरलं आहे.
हे देखील वाचा-