IND Vs ZIM: भारत आणि झिम्बॉव्वे (India vs Zimbabwe) यांच्यात येत्या 18 ऑगस्ट 2022 पासून तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेपूर्वी भारताला मोठा धक्का लागला. भारताचा स्टार ऑलराऊंडर वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) झिम्बॉव्वे दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी दुखापतग्रस्त झालाय.  सुंदरची दुखापत किती गंभीर आहे? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळं झिम्बॉव्वे दौऱ्यावर जाणार की नाही? हे येत्या काही दिवसातंच स्पष्ट होईल. 

काऊंटी क्रिकेटमध्ये वॉशिंग्टन सुंदरचं दमदार प्रदर्शन
वॉशिंग्टन सुंदर गेल्या दोन वर्षांपासून दुखापतीशी झुंजतोय. नुकतीच त्यानं काऊंटी क्रिकेटद्वारे मैदानात पुरागमन केलं होतं. काऊंटी क्रिकेटमध्ये सुंदर चेंडूनं अप्रतिम कामगिरी करत दाखवली. त्यानं काऊंटी क्रिकेटच्या पदार्पणाच्या सामन्यातच पाचहून अधिक विकेट्स घेतले. इतकेच नाही तर काऊंटी क्रिकेटदरम्यान त्यानं शानदार अर्धशतक झळकावलंय. मात्र आता सुंदरला दुखापत झाल्याची माहिती मिळत आहे. रॉयल लंडन वन डे चषकात लँकेशायर आणि वूस्टरशायर यांच्यात खेळल्या जात असलेल्या सामन्यात सुंदर सहभागी झाला होता. परंतु, क्षेत्ररक्षण करताना सुंदरला दुखापत झाली. त्यावेळी सुंदरला  मैदानाबाहेर जावा लागलं होतं. आता या सामन्यात त्याला गोलंदाजी करता येणार नसल्याची माहिती सुंदरच्या संघानं दिलीय.

वॉशिंग्टन सुंदरची दुखापतीशी झुंज
आयपीएल 2022 नंतर वॉशिंग्टन सुंदर भारतीय संघाचा भाग बनला.  ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गब्बाच्या ऐतिहासिक सामन्यातील विजयात त्यानं बॅट आणि चेंडूनं महत्वपूर्ण योगदान दिलं होतं. यानंतर इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेतही सुंदरची कामगिरी चांगली होती. मात्र, त्यानंतर  मात्र, त्यानंतरच सुंदरला दुखापतींना सामोरं जावं लागलं. यंदाच्या आयपीएलमध्येही सुंदरला दुखापत झाली होती. इतकेच नाही तर यानंतर सुंदरला भारतासाठी कोणत्याही मालिकेचा भाग होता आलं नाही. जर सुंदर दुखापतीतून लवकर बरा झाला नाही, तर टीम इंडियात पुनरागमन करणे त्याच्यासाठी खूप कठीण होईल.

भारत- झिम्बॉव्वे एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक

सामना कधी ठिकाण
पहिला एकदिवसीय सामना 18 ऑगस्ट 2022 हरारे स्पोर्ट्स क्लब
दुसरा एकदिवसीय सामना 20 ऑगस्ट 2022 हरारे स्पोर्ट्स क्लब
तिसरा एकदिवसीय सामना 22 ऑगस्ट 2022 हरारे स्पोर्ट्स क्लब

दरम्यान, तब्बल सहावर्षानंतर भारतीय संघ झिम्बॉवेचा दौरा करणार आहे. यापूर्वी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात 2016 मध्ये भारतानं झिम्बॉवे दौरा केला होता. त्यावेळी भारतानं झिम्बॉवेविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय आणि तितक्याच सामन्यांची टी-20 मालिका खेळली होती. 

हे देखील वाचा-