सिडनी : ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क आणि महिला संघाची यष्टीरक्षक एलिसा हिली लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. स्टार्क - हिलीचा  विवाहसोहळा शुक्रवारी संपन्न झाला.


 

दुखापतीमुळे यंदा स्टार्क टी 20 विश्वचषकात खेळू शकला नव्हता. याशिवाय यंदा आयपीएलमध्येही तो सहभागी झालेला नाही.

 

दुसरीकडे एलिसी हिलीनं महिलांच्या ट्वेन्टी20 विश्वचषकाची फायनल गाठणाऱ्या ऑस्ट्रेलियाचं प्रतिनिधित्व केलं होतं.

 

क्रिकेट हे एलिसाच्या रक्तातच आहे. तीचे वडील ग्रेग ऑस्ट्रेलियातले प्रथम श्रेणी क्रिकेटर होते, तर ऑस्ट्रेलियाचे महान यष्टीरक्षक इयन हिली हे एलिसाचे चुलते आहेत.

 

एलिसा आणि मिचेल यांची जुनी मैत्री आहे.  दोघेही आपआपल्या संघाकडून कसोटीतही खेळतात.