मुंबई : 'भाभीजी घर पर है' मधील अंगुरी भाभी उर्फ शिल्पा शिंदेने सिन्टा (सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन) विरोधात मुंबईच्या बंगुरनगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.


 

मालिका मध्येच सोडल्याच्या कारणामुळे सिन्टा शिल्पा शिंदेवर आजीवन बंदी घालण्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र मला काम करण्यापासून रोखण्याचा अधिकार सिन्टाला नाही, असं शिल्पा शिंदेंने तक्रार दाखल करण्यापूर्वी म्हटलं होतं. मला निर्मात्यांकडून सातत्याने त्रास होत आहे, असा आरोप शिल्पाने केला आहे.

 

एका इंग्लिश वृत्तपत्रानुसार मालिका मध्ये सोडणं आणि अनप्रोफेशनल वागणुकीविरोधात निर्माता बिनेफर कोहलीने शिल्पाविरोधात सिन्टाकडे तक्रार केली होती. त्यानंतर CINTAA ने शिल्पाविरोधात नॉन को-ऑपरेशन सर्क्युलर जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. याचाच अर्थ आता तिच्यासोबत कोणत्याही चॅनल किंवा निर्मात्याला काम करण्याची परवानगी नसेल.

 

संबंधित बातम्या

'अंगुरी भाभी' उर्फ शिल्पा शिंदेवर आजीवन बंदी?


‘भाभीजी घर पर हैं’ मधून भाभी घराबाहेर?


‘भाभी जी घर पर हैं’ च्या शिल्पा शिंदेला कायदेशीर नोटीस!


शिल्पाला ‘भाभी जी घर पर हैं’ सोडण्यासाठी कपिलने भडकावलं?


‘अंगुरी भाभी’ उर्फ शिल्पा शिंदेचं लग्न होता होता राहिलं!