आमदार रवी राणा यांच्या कार्यालयाची तोडफोड
एबीपी माझा वेब टीम | 15 Apr 2016 09:33 AM (IST)
अमरावती : अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. तोडफोड सुरु असताना पोलिस तिथे हजर असून कोणीही त्यांना जुमानलं नाही. पोलिसांसमोरच कार्यालयाच्या काचा फोडल्या आणि खुर्च्याही फेकल्या दरम्यान, भाजपच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयाची तोडफोड केल्याचा आरोप, आमदार रवी राणा यांनी केला आहे. अमरावतीचे पालकमंत्री प्रवीण पोटेंविरोधात केलेल्या विधानामुळे रवी राणांच्या ऑफिसची तोडफोड झाल्याचं म्हटलं जात आहे.