एक्स्प्लोर

कुठे सेटिंग नसल्यामुळे कोच होऊ शकलो नाही : सेहवाग

सेटिंग नसल्यामुळे आपल्याला टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होता आलं नाही. यापुढेही कधीच या पदासाठी अर्ज करणार नाही, असं सेहवागने म्हटलं आहे.

नवी दिल्ली : टीम इंडियाचा माजी सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवागने खळबळजनक वक्तव्य केलं आहे. बीसीसीआयमधील काही अधिकाऱ्यांचा पाठिंबा नसल्यामुळे टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होता आलं नाही. या पदासाठी आता पुन्हा अर्ज करणार नाही, असं सेहवागने म्हटलं आहे. टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत रवी शास्त्री आणि सेहवाग यांच्यात मुख्य टक्कर होती. मात्र रवी शास्त्री यांची निवड करण्यात आली. हा निर्णय क्रिकेट सल्लागार समितीलाही मान्य नव्हता. या समितीनेच प्रशिक्षकपदासाठी मुलाखती घेतल्या होत्या. ''जे प्रशिक्षक निवडणारे होते त्यांच्याशी माझी सेटिंग नसल्यामुळे मी प्रशिक्षक होऊ शकलो नाही. अर्ज करत असतानाच बीसीसीआयच्या काही अधिकाऱ्यांनी मन विचलित करण्याचा प्रयत्न केला,'' असा दावा सेहवागने 'इंडिया टीव्ही'च्या एका कार्यक्रमात बोलताना केला. टीम इंडियाला प्रशिक्षण देण्याचा आपण कधीही विचार केला नव्हता. मात्र बीसीसीआयचे सचिव अमिताभ चौधरी यांनी अर्ज करण्यासाठी आग्रह केला. त्यानंतर विचार करण्यासाठी वेळ घेतला आणि अर्ज केला, अशी माहितीही सेहवागने दिली. अर्ज करण्यापूर्वी विराट कोहलीचाही सल्ला घेतला होता. त्यानंतरच अर्ज करण्याचा निर्णय घेतला. प्रशिक्षकपदासाठी अर्ज करणं ही माझी स्वतःची इच्छा नव्हती आणि यापुढेही कधी अर्ज करणार नाही, असंही सेहवागने स्पष्ट केलं. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या काळात इंग्लंडमध्ये असताना रवी शास्त्री यांना विचारलं होतं, की तुम्ही अर्ज का केला नाही. तर त्यांनी उत्तर दिलं की एकदा केलेली चूक पुन्हा करायची नाही. रवी शास्त्री यांनी माझ्या अगोदर अर्ज केला असता तर मी अर्ज करण्याची कसलीही शक्यता नव्हती, अशी माहितीही सेहवागने दिली.

महत्त्वाच्या बातम्या

BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
IND vs SL : सिराज, कृष्णा, गुरनूर ब्रार, आकिब नबी, चारपैकी कोणत्या दोन वेगवान गोलंदाजांना प्लेईंग XI मध्ये संधी? अजिंक्य रहाणेचा महत्त्वाचा सल्ला
श्रीलंकेविरोधातील पहिल्या कसोटीत कोणत्या दोन वेगवान गोलंदाजांना संधी? अजिंक्य रहाणेनं दोघांची नाव सांगितली
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget