एक्स्प्लोर
मिस्बाह उल हकचा लॉर्डसवर नवा विक्रम
नवी दिल्ली : पाकिस्तान आणि इंग्लंड विरूद्ध लॉर्डस मैदात सुरु असलेल्या कसोटी सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार मिस्बाह-उल-हकच्या नाबाद ११० आणि अशद शफीकच्या ७३ धावांच्या बदल्यात पाकिस्तानने २८२ धावांची आघाडी मिळाली. मिस्बाहची इंग्लडमधील ही पहिली शतकी खेळी आहे.
मिस्बाहाने आपल्या वयाच्या ४२ व्या वर्षी शतक झळकावून हा विक्रम केला आहे. यापूर्वी बॉब सिम्पसन यांनी १९७७ साली ४१ व्या वर्षी शतक झळकावले होते.
पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर माध्यमांशी चर्चा करताना मिस्बाह म्हणाला की, ''ही खेळी माझ्यासोबतच माझ्या संघाला अतिशय महत्त्वपूर्ण आहे. माझ्यावर विकेट टीकवून खेळी करण्याची जबाबदारी होती. लॉर्डस मैदानावरील हे माझे पहिले शतक आहे. मी माझे हे शतक माझ्या पत्नीला समर्पित करतो. कारण मी जेव्हा मैदानावर खेळत असतो, तेव्हा माझी पत्नी माझ्या चांगल्या कामगिरीसाठी व्रत करते.''
टॉस जिंकून पाकिस्तानी संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. फलंदाजीसाठी उतरलेल्या सलमीवीर मोहम्मद हफीज आणि शान मसूद यांना क्रिस वोक्सने बाद करून मोठे धक्के दिले होते. अजहर अली (७), यूनिस खान(३३), मिस्बाह उल हक यांनी चांगली कामगिरी केली. पण, स्टूअर्ड ब्रॉडने मोइन अलीमार्फत त्याला कॅच आऊट केले.
त्यानंतर मिस्बाहची सोबत देण्यासाठी मैदानावर उतरलेल्या शफीकने १४८ची धावांची भागीदारी करून पाकिस्तानी संघाला चांगली आघाडी मिळवून दिली.
मिस्बाहने ११० धावा १७९ चेंडूत केल्या. यामध्ये १८ चौकारांचाही समावेश आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement