एक्स्प्लोर
Advertisement
बॅटचा आकार नाही तर खेळपट्ट्या बदलणं गरजेच: सचिन तेंडुलकर
मुंबई: 'बॅटचा आकार नाही तर खेळपट्ट्या बदलण्याची गरज आहे. ज्यामुळे गोलंदाजांना आपलं कौशल्य दाखवता येईल.' असं स्पष्ट मत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं व्यक्त केलं आहे. बॅटचा आकार बदलण्याबाबत सध्या क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु आहे. त्यावरच सचिनने ही प्रतिक्रिया दिली आहे.
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉण्टिंगनं बॅटच्या आकाराबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर आता बॅटच्या आकारात बदल होण्याच शक्यता आहे. फलंदाजांचा वाढता दबदबा पाहता विश्व क्रिकेट समितीनं मंगळवारी बॅटच्या लांबी आणि जाडीबद्दल काही सूचना दिल्या आहेत.
क्रिकेट नियामक संस्था एमसीसीच्या 2014च्या एका रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, मागील काही वर्षात बॅटच्या जाडीमध्ये 300 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ज्यामुळे कधीकधी चुकीचा फटकाही सीमा रेषेपार जातो.
जर बॅटसंबंधी नियमात बदल केल्यास ऑक्टोबर 2017 पासून फलंदाजांना नव्या बॅटनं खेळावं लागणार आहे.
काय आहेत नियम:
1. आतापर्यंत क्रिकेटमध्ये बॅटीची रुंदी आणि जाडीबाबत नियमच असे होते की ज्यामुळे अनेक फलंदाजांच्या बॅटच्या कडा मागून आणि पुढून बऱ्याच मोठ्या होत्या. (उदा. वॉर्नरची बॅट) त्यामुळे पॉण्टिंगनं वॉर्नरवर टीकाही केली होती. आता नव्या नियमानुसार, बॅट 60mm ते 65mm मध्ये तयार केली जावी. तर बॅटच्या कडा या 35mm ते 40mm पर्यंतच असायला हव्या.
बॅट्च्या आकाराचा विचार केल्यास 1980 मध्ये 18mm होता तोच आता 80mm पर्यंत पोहचला आहे. ज्यामुळे खणखणीत फटकेही पाहायला मिळतात.
बॅटमधील हेच बदल पाहता एमसीसीच्या सदस्यांनी (ज्यामध्ये पॉण्टिंगचाही समावेश आहे) बॅटबाबत नव्या नियमाची शिफारस केली आहे.
सचिननं केलं वॉर्नरचं समर्थन:
वॉर्नरनं मागील आठवड्यात म्हटलं होतं की, रुंद बॅटमुळे पाटा विकेटवर फलंदाजांना बराच फायदा होतो आहे. तेंडुलकरनं ऑस्ट्रेलियाच्या या फलंदाजाचं समर्थन केलं आहे.
तेंडुलकर म्हणतो की, "खेळपट्ट्या बदलण्याची गरज आहे. त्या गोलंदाजांना पोषक हव्यात. टी20 क्रिकेटमध्ये उत्कृष्ट गोलंदाजांच्या गोलंदाजीवर देखील फलंदाज रिव्हर्स स्वीप शॉट खेळतात. वनडेमध्ये तर विजयासाठी तीनशेपेक्षा अधिक धावाही सेफ मानल्या जात नाही. त्यामुळे खेळाचं स्वरुप असं असायला हवं ज्यामध्ये गोलंदाजांना आपलं कौशल्य दाखवता येईल."
तेंडुलकर म्हणाला की, "तुम्हाला खेळपट्ट्यांमध्ये बदल करणं गरजेचं आहे. मला वाटत नाही की, याचं बॅटच्या आकाराशी काही देणंघेणं आहे. मला आशा आहे की, पॅनल या गोष्टीचा विचार करेल. ही गोष्ट वॉर्नरही म्हणाला होता."
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
क्राईम
राजकारण
Advertisement