एक्स्प्लोर
कर्णधार पृथ्वी शॉला MCAकडूनंही मोठं इनाम!
'विश्वकप विजेत्या भारतीय संघाचा कप्तान मुंबईकर पृथ्वी शाॅ याला मुंबई क्रिकेट एसोसिएशन तर्फे 25 लाख रूपयांचे बक्षीस जाहीर करताना मला अत्यंत आनंद होतो आहे. संपूर्ण संघाचे ही मनापासुन अभिनंदन!'
मुंबई : भारताने 8 गडी राखून ऑस्ट्रेलियावर मात करत अंडर-19 विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. चार वेळा अंडर-19 चा विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम टीम इंडियाने केला आहे. पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने या संपूर्ण विश्वचषकात शानदार कामगिरी केली. त्यामुळे पृथ्वी शॉ आणि त्याच्या संघावर सध्या सर्वच स्तरातून बक्षीसाचा वर्षाव सुरु आहे. बीसीसीआय पाठोपाठ एमसीएने कर्णधार पृथ्वी शॉला खास बक्षिस जाहीर करण्यात आलं आहे.
विश्वचषक जिंकल्यानंतर बीसीसीआयने भारतीय संघाच्या खेळाडू, प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफसाठी बक्षीसाची घोषणा केली होती. बीसीसीआयने सर्व खेळाडूंना 30 लाख, प्रशिक्षक राहुल द्रविडला 50 लाख आणि सपोर्ट स्टाफला 20 लाख रुपये बक्षीस जाहीर केलं होतं. त्यानंतर आता कर्णधार पृथ्वी शॉ याला मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) 25 लाखांचं बक्षीस जाहीर केलं आहे.
एमसीए अध्यक्ष आणि भाजप आमदार आशिष शेलार यांनी ट्विटरवरुन याची घोषणा केली आहे.
भारताने याआधी २०००, २००८ आणि २०१२ साली अंडर नाईन्टिनचा विश्वचषक जिंकला होता. संबंधित बातम्या : ऐतिहासिक विजयानंतर BCCIकडून टीम इंडियाला खास बक्षीस! अंडर-19 विश्वचषक : टीम इंडियाने चौथ्यांदा वर्ल्डकप पटकावला!विश्वकप विजेत्या भारतीय संघाचा कप्तान मुंबईकर पृथ्वी शाॅ याला मुंबई क्रिकेट एसोसिएशन तर्फे 25 लाख रूपयांचे बक्षीस जाहीर करताना मला अत्यंत आनंद होतो आहे. संपूर्ण संघाचे ही मनापासुन अभिनंदन!
— ashish shelar (@ShelarAshish) February 3, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement