एक्स्प्लोर

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर फलंदाजीसाठी पुन्हा मैदानात...

मुख्य सामन्याच्या ब्रेकमध्ये प्रेक्षकांना सचिन आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला गोलंदाजामधलं द्वंद्व पाहायला मिळालं. सचिननं एलिस पेरीच्या पहिल्या चेंडूवर चौकार ठोकून आपल्या चाहत्यांना खूश केलं.

ऑस्ट्रेलिया : ऑस्ट्रेलियातल्या वणवाग्रस्तांच्या मदतनिधीसाठी आयोजित सामन्यानिमित्तानं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर फलंदाजीसाठी पुन्हा मैदानात उतरला. मुख्य सामन्याच्या ब्रेकमध्ये प्रेक्षकांना सचिन आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला गोलंदाजामधलं द्वंद्व पाहायला मिळालं. सचिननं एलिस पेरीच्या पहिल्या चेंडूवर चौकार ठोकून आपल्या चाहत्यांना खूश केलं. ऑस्ट्रेलियन महिला गोलंदाज एलिस पेरी आणि एनाबेल सुथरलँड हिने सचिनला गोलंदाजी केली. दोघींनी मिळून सचिनला एक षटक फेकले. यात पेरीने सचिनला चार चेंडू फेकले. ज्यात तेंडुलकरने दोन चौकार खेचले. पेरिनंतर सचिनने एनाबेलाच्या दोन चेंडूचा सामना केला. यानंतर सचिनने साडेपाच वर्षानंतर पहिल्यांदा बॅट हातात घेतल्याचे सांगितले. ऑस्ट्रेलियात काही दिवसांपूर्वी बुशफायरमुळे लाखो जनावरे होरपळून मृत्युमुखी पडली होती. आगीमुळे अनेक घरांची राखरांगोळी झाली. या हानीमुळे नुकसान झालेल्यांना दिलासा देण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने निवृत्त क्रिकेटपटूंमध्ये एक सामना आयोजित केला आहे. हा सामना पॉटिंग इलेव्हन विरुद्ध गिलख्रिस्ट इलेव्हन यांच्यात खेळवण्यात आला. यावेळी ब्रेकच्या वेळेत सचिनने ऑस्ट्रेलियन महिला गोलंदाजांच्या गोलंदाजीवर फलंदाजी केली. ऑस्ट्रेलियातल्या वणवाग्रस्तांच्या मदतनिधीसाठी आयोजित दहा दहा षटकांच्या सामन्यात पॉन्टिंग इलेव्हननं गिलख्रिस्ट इलेव्हनचा एका धावेनं निसटता पराभव केला. हा सामना मेलबर्नच्या जंक्शन ओव्हलवर खेळवण्यात आला. पॉन्टिंग इलेव्हननं या सामन्यात पाच बाद 104 धावांची मजल मारली होती. पण गिलख्रिस्ट इलेव्हनला सहा बाद 103 धावाच करता आल्या. संबंधित बातम्या :  IND vs BAN, U 19 Final Score : बांगलादेशसमोर भारतीय संघाचं 178 धावांचं आव्हान Sachin Tendulkar | नवी मुंबईत 'तेंडुलकर मिडलसेक्स'ची क्रिकेट अॅकॅडमी | ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

IND vs ZIM : लढाई एकतर्फी होणार नाही, सलग दोन देशांविरुद्ध पराभवाचं तोंड पाहणाऱ्या टीम इंडियाला झिम्बाब्वेच्या कर्णधाराचं आव्हान, सिकंदर रझा म्हणाला...
लढाई एकतर्फी होणार नाही, टीम इंडियाला झिम्बाब्वेच्या कर्णधाराचं आव्हान, सिकंदर रझा नेमंक काय म्हणाला?
Team India : भारताची पराभवाची मालिका थांबेना, इंग्लंडमध्ये टी 20  नंतर वनडे मालिका गमावली,  तीन खेळाडूंसाठी टीमची दारं बंद?
भारताची पराभवाची मालिका थांबेना, इंग्लंडमध्ये वनडे मालिकेत पराभव, तीन खेळाडूंसाठी भारताची दारं बंद
Rohit Sharma Ind Vs Eng ODI: मुंबईचा राजा रोहित शर्माने सिलेक्टर्सच्या नाकावर टिच्चून शतक ठोकलं, वय झालं म्हणणाऱ्यांना तोंडघशी पाडलं
मुंबईचा राजा रोहित शर्माने सिलेक्टर्सच्या नाकावर टिच्चून शतक ठोकलं, वय झालं म्हणणाऱ्यांना तोंडघशी पाडलं
Ferran Torres Story: वयाच्या सहाव्या वर्षी आजोबांच्या तालमीत प्रशिक्षण; घरच्या कुत्र्याला गोलकीपर बनवत सराव; विश्वचषकात स्पेनला विश्वचषक मिळवून देणारा फेरान टोरेस कोण?
वयाच्या सहाव्या वर्षी आजोबांच्या तालमीत प्रशिक्षण; घरच्या कुत्र्याला गोलकीपर बनवत सराव; विश्वचषकात स्पेनला विश्वचषक मिळवून देणारा फेरान टोरेस कोण?

व्हिडीओ

Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं
Sandeep Deshpande:मोदींपेक्षा जास्त अहंकार अश्विनी भिडेंना; चेंबूर दुर्घटनेवरून संदीप देशपांडे भडकले
Sanjay Raut PC : 20 जुलै हा लोकशाहीतील 'डरपोक दिवस' म्हणून साजरा करा; संजय राऊत आक्रमक
Delhi CJP Protest | जंतर-मंतर ते सफदरजंग, वांगचुक-दिपके आंदोलनाचा निर्णायक दिवस | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonam wangchuk: उद्धव ठाकरे जंतरमंतरवर, राज ठाकरे आझाद मैदानात; नीट पेपरफुटीवरुन ठाकरे बंधू थेट आंदोलनात, काँग्रेसंही रस्त्यावर
उद्धव ठाकरे जंतरमंतरवर, राज ठाकरे आझाद मैदानात; नीट पेपरफुटीवरुन ठाकरे बंधू थेट आंदोलनात, काँग्रेसंही रस्त्यावर
शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचं दिल्लीत आंदोलन, राहुल गांधींसह महाराष्ट्रातील खासदारही पोलिसांच्या ताब्यात
शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचं दिल्लीत आंदोलन, राहुल गांधींसह महाराष्ट्रातील खासदारही पोलिसांच्या ताब्यात
AI तंत्रज्ञानाच्या मदतीने अंधत्वावर मात; गडचिरोली जिल्हा परिषदेचा उपक्रम, 34 विद्यार्थ्यांच्या हाती अत्याधुनिक स्मार्ट उपकरणे
AI तंत्रज्ञानाच्या मदतीने अंधत्वावर मात; गडचिरोली जिल्हा परिषदेचा उपक्रम, 34 विद्यार्थ्यांच्या हाती अत्याधुनिक स्मार्ट उपकरणे
Uddhav Thackeray : एका राजीनाम्यानं चालणार नाही, व्यवस्था बदलावी लागेल, सरकार बदलत नाही तोपर्यंत आयुष्य बदलणार नाही : उद्धव ठाकरे
भाषण करायला नाही युवा शक्तीला नमन करायला आलोय, उद्धव ठाकरेंच्या जंतरमंतरवरील भाषणाला जोरदार प्रतिसाद
Rahul Gandhi : राहुल गांधींची नीट पेपरफुटीवरील संसदेतील चर्चेची मागणी मान्य, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर जितेंद्र सिंह नेमकं काय म्हणाले? 
राहुल गांधींची नीट पेपरफुटीवरील संसदेतील चर्चेची मागणी मान्य, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर जितेंद्र सिंह नेमकं काय म्हणाले? 
अमरावतीतून वारी, काठी टेकत आली 80 वर्षांची आजी; कलेक्टरांनी दिलं विठ्ठलाचं VIP दर्शन, पुंडलिकाची आठवण
अमरावतीतून वारी, काठी टेकत आली 80 वर्षांची आजी; कलेक्टरांनी दिलं विठ्ठलाचं VIP दर्शन, पुंडलिकाची आठवण
दिल्लीत नरेंद्र मोदींच्या घरासमोर राडा, पोलिसांनी राहुल गांधींना उचललं; प्रियंका गांधींसह माजी मुख्यमंत्रीही ताब्यात
दिल्लीत नरेंद्र मोदींच्या घरासमोर राडा, पोलिसांनी राहुल गांधींना उचललं; प्रियंका गांधींसह माजी मुख्यमंत्रीही ताब्यात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जुलै 2026 | मंगळवार
Embed widget