Mary Kom Injury: भारताची स्टार बॉक्सर आणि सहा वेळची जगज्जेती मेरी कोमला अँटीरियर क्रूसिएट लिगामेंट (ACL) दुखापत झाली. या दुखापतीनंतर री कोम अडचणीत सापडली आहे. कारण, डॉक्टरांनी तिला शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला आहे. ज्यामुळं तिला बॉक्सिंगपासून दीर्घकाळ दूर राहावं लागण्याची शक्यता आहे.
मेरी कोमला शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला
दिल्ली येथे महिला भारतीय बॉक्सिंग राष्ट्रकुल क्रीडा 2022 च्या निवड चाचण्यांदरम्यान मेरी कोमला हरियाणाच्या नीतूविरुद्ध (48 किलो) उपांत्य फेरीत तिच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाली होती. त्यानंतर डॉक्टरांनी तिच्या गुडघ्याचं स्कॅन केलं. तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी तिला पुन्हा शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिलाय.
olympics.com च्या अहवालात काय म्हटलंय?
गोल्ड कोस्ट 2018 मध्ये सीडब्लूजी सुवर्णपदक जिंकणारी मेरी कोम पहिली भारतीय महिला बॉक्सर ठरली. लंडन 2012 कांस्यपदक विजेत्याला औषधोपचार व्यतिरिक्त बर्फ आणि गुडघ्याला आधार देण्याच्या सल्ला दिला गेला आहे, असं olympics.com च्या अहवालात म्हटलं गेलं आहे.
मेरी कोम काय म्हणाली?
दुखापतीची तीव्रता 39 वर्षीय मेरीसाठी मोठा धक्का आहे. मेरी कोम तिच्या कारकिर्दीतील शेवटच्या टप्प्यात आहे. "माझ्यासोबत यापूर्वी असे कधीच घडले नव्हते आणि यातून सावरण्यासाठी मी धडपडत आहे. मला खात्री आहे की मी लवकरच माझ्या जुन्या फॉर्ममध्ये परतेन", असं मेरी कोमनं न्यू इंडियन एक्स्प्रेसला म्हटलं आहे.
हे देखील वाचा-