India vs South Africa 2nd T20I: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना आज कटक येथील बाराबती स्टेडियमवर खेळला जातोय. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमानं नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीचं आमंत्रण दिलं आहे. या सामन्यातील पहिल्या षटकात दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडानं भारताचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडला बाद करून टी-20 क्रिकेटमधील 50 विकेट्सचा टप्पा पूर्ण केला.


कागिसो रबाडाची उत्कृष्ट कामगिरी
भारताच्या डावातील पहिल्याच षटकात कागिसो रबाडाच्या गोलंदाजीवर ऋतुराज गायकवाड केशव महाराजच्या हातात झेल देऊन माघारी स्वस्तात माघारी परतला. ऋतुराज गायकवाडला बाद करून कागिसो रबाडानं आपल्या नावावर त्याने आता टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 50 विकेट्स पूर्ण केल्या आहेत. त्यानं फक्त 42 सामन्यांमध्ये टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 50 विकेट्स घेण्याचा पराक्रम केलाय. टी-20 क्रिकेटमध्ये 50 विकेट घेणारा रबाडा हा दुसरा सर्वात वेगवान आफ्रिकन गोलंदाज ठरलाय.


ट्वीट-



टी-20 मध्ये 50 विकेट घेणारा चौथा आफ्रिकन गोलंदाज 
टी-20 मध्ये 50 विकेट्स घेणारा रबाडा दक्षिण आफ्रिकेचा चौथा गोलंदाज ठरलाय. त्यांच्याआधी डेल स्टेन, इम्रान ताहिर आणि तबरेझ शम्सी यांच्या नावावर 50 विकेट्स घेण्याची नोंद आहे. टी-20 मध्ये डेल स्टेननं  64, ताहिरनं 61 आणि शम्सीनं 57 विकेट्स घेतल्या आहेत.


दक्षिण आफ्रिकेच्या संघात दोन बदल
दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय संघात कोणताही बदल झाल्याचं पाहायला मिळालं नाही. तर, दक्षिण आफ्रिकेच्या संघात दोन बदल करण्यात आले आहेत. हाताच्या दुखापतीमुळं क्विंट डी कॉक या सामन्यातून बाहेर पडला आहे, तर मागील सामन्यात पदार्पण करणाऱ्या स्टब्सलाही विश्रांती देण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर हेनरिक क्लासेन आणि रीझा हेंड्रिक्सला संघात स्थान देण्यात आलं आहे. 


हे देखील वाचा-