Shahrukh Khan Upcoming Films : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) आगामी 'डंकी' (Dunki) सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. किंग खानचे चाहते त्याच्या आगामी सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. आता शाहरुखने त्याच्या आगामी 'डंकी' सिनेमाचे शूटिंग पूर्ण केले आहे. लवकरच तो 'जवान'च्या शूटिंगला सुरुवात करणार असे म्हटले जात आहे. 


'पठाण'नंतर शाहरुखचे तीन सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यात राजकुमार हिरानी यांच्या 'डंकी' सिनेमाचादेखील समावेश आहे. शाहरुख खान आणि राजकुमार हिरानी 'डंकी'च्या माध्यमातून पहिल्यांदाच एकत्र काम करत आहे. 'डंकी' सिनेमात शाहरुखचा मजेशीर डान्सदेखील प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. गणेश आचार्य हा डान्स बसवणार आहेत. 


एटलीसोबत जवानच्या शूटिंगला करणार सुरुवात 


मीडिया रिपोर्टनुसार, शाहरुख खान दाक्षिणात्य सिनेदिग्दर्शक एटलीच्या आगामी 'जवान'च्या शूटिंगला सुरुवात करणार आहेत. तसेच 'टायगर 3' या सिनेमाच्या शूटिंगलादेखील सुरुवात करणार आहे. 'जवान' सिनेमातील शाहरुखचा फर्स्‍ट लूक प्रेक्षकांच्या भेटीला आला असून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या सिनेमात शाहरुखसोबत दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारादेखील दिसणार आहे. तसेच सान्या मल्होत्रादेखील या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.


22 डिसेंबरला सिनेमा होणार प्रदर्शित


'डंकी'चे उरलेले शूटिंग लंडनमध्ये होणार आहे. लवकरच यादेखील सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. शाहरुख खान अभिनित या सिनेमाचे दिग्दर्शन राजकुमार हिरानी करत आहेत. या सिनेमात शाहरुख खान आणि तापसी पन्नू मुख्य भूमिकेत आहेत. राजकुमार हिरानी, ​​अभिजात जोशी आणि कनिका धिल्लन यांनी लिहिलेल्या या सिनेमाची निर्मिती राजकुमार हिरानी आणि गौरी खान यांनी केली आहे. एप्रिलपासून या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाली होती. ‘डंकी’ हा सिनेमा 22 डिसेंबर 2023 रोजी रिलीज होणार आहे.


शाहरुखने सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या आगामी 'डंकी' सिनेमाची घोषणा केली होती. शाहरुखने 'डंकी' सिनेमा संबंधित एक व्हिडीओ शेअर केला होता. या सिनेमाच्या निमित्ताने शाहरुख पहिल्यांदाच राजकुमार हिरानीसोबत काम करणार आहे. या सिनेमाची घोषणा झाल्याने चाहते आता या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या सिनेमाशिवाय शाहरुखचा 'पठाण' हा सिनेमा 25 जानेवारी 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. 


संबंधित बातम्या


Dunki : राजकुमार हिरानींसोबत दिसला शाहरुख खान, ‘डंकी’च्या सेटवरील नवा फोटो सोशल मीडियावर व्हायरल!


Dunki Movie : किंग खानचा 'डंकी' सिनेमा 'या' दिवशी होणार प्रदर्शित, शाहरुखने सोशल मीडियाद्वारे दिली माहिती