IND vs SA, 2nd T20 Live: दुसऱ्या टी-20 सामन्यात नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेनं भारताला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलंय. कटकच्या बाराबती स्डेडियमवर हा खेळला जाणार आहे. पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागला. मात्र, दुसऱ्या टी-20 सामन्यात विजय मिळवून भारतीय संघ 1-1 नं बरोबरी साधण्यासाठी सज्ज झालाय. तर, या सामन्यात भारताला पराभूत करून 2-0 अशी आघाडी घेण्याचा दक्षिण आफ्रिकेचा प्रयत्न असेल. यामुळं आजच्या सामन्यात कोणता संघ बाजी मारणार? हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ दोन बदल करून मैदानात उतरला आहे. क्विंटन डी कॉक आणि ट्रिस्टन स्टब्स यांच्याऐवजी हेनरिक क्लासेन आणि रीझा हेंड्रिक्सला संघात जागा देण्यात आली आहे.
भारत- दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना कधी, कुठे पाहायचा?
आज 12 जून रोजी होणारा भारत आणि दक्षिण आफ्रिका हा सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजता सुरु होईल. 6 वाजून 30 मिनिटांनी नाणेफेक होईल. हा सामना कटकच्या बाराबती मैदानावर खेळवला जाणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा टी-20 सामना स्टार स्पोर्ट नेटवर्कवर पाहता येणार आहे. वेगवेगळ्या भाषेतून सामना पाहता येणार आहे. तसेच हॉटस्टार अॅपवरही सामना पाहता येईल. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला सामन्याचे लाईव्ह कव्हरेज पाहता येईल.
भारताची प्लेईंग इलेव्हन:
इशान किशन, रुतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (कर्णधार, विकेटकिपर), हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल, आवेश खान
दक्षिण आफ्रिकेची प्लेईंग इलेव्हन:
टेम्बा बावुमा (कर्णधार), रीझा हेंड्रिक्स, रॅसी व्हॅन डर ड्युसेन, डेव्हिड मिलर, हेनरिक क्लासेन (विकेटकिपर), ड्वेन प्रिटोरियस, वेन पारनेल, केशव महाराज, तबरेझ शम्सी, कागिसो रबाडा, एनरिक नॉर्टजे
हे देखील वाचा-