IND vs SA, 2nd Innings Highlights: दक्षिण आफ्रिकेच्या भेदक गोलंदाजीसमोर भारतीय संघानं (India vs South Africa) गुडघे टेकले. नाणेफेक गमावल्यानंतर भारतीय संघानं 20 षटकात सात विकेट्स गमावून 148 धावा केल्या. भारताकडून श्रेयस अय्यरनं (Shreyas Iyer) सर्वाधिक 40 धावांची खेळी केली. तर, दक्षिण आफ्रिकडून एनरिक नॉर्टजे (Anrich Nortje) सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या. दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 149 धावांची आवश्यकता आहे. या सामन्यात भारतीय गोलंदाज कशी कामगिरी बजावजात? हे सामन्याच्या अखेरिस स्पष्ट होईल.


प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या भारताची सुरुवात चांगली झाली नाही. संघाचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड पहिल्याच षटकात एक धाव करून पव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर इशान किशननं काही मोठे फटके खेळले. मात्र तो 34 धावांवर बाद झाला. कर्णधार ऋषभ पंतनं फक्त पाच धावा केल्या. श्रेयस अय्यरनं 40 धावा केल्या. हार्दिक पांड्याला यंदाच्या सामन्यातही काही खास कामगिरी करता आली नाही. तो नऊ धावा करून माघारी परतला. दिनेश कार्तिकनं शेवटच्या षटकात दोन षटकार मारून संघाची धावसंख्या 140 च्या पुढे नेली. कार्तिक 21 चेंडूत 30 धावा करून नाबाद राहिला. दक्षिण आफ्रिकेकडून एनरिक नोर्टिजेनं सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या. तर, कागिसो रबाडा, वेन पारनेल, ड्वेन प्रिटोरियस आणि केशव महाराज यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.


भारताची प्लेईंग इलेव्हन:
 इशान किशन, रुतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (कर्णधार, विकेटकिपर), हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल, आवेश खान.


दक्षिण आफ्रिकेची प्लेईंग इलेव्हन:
टेम्बा बावुमा (कर्णधार), रीझा हेंड्रिक्स, रॅसी व्हॅन डर ड्युसेन, डेव्हिड मिलर, हेनरिक क्लासेन (विकेटकिपर), ड्वेन प्रिटोरियस, वेन पारनेल, केशव महाराज, तबरेझ शम्सी, कागिसो रबाडा, एनरिक नॉर्टजे. 


हे देखील वाचा-