एक्स्प्लोर
अवघ्या 35 चेंडूंत मार्टिन गप्टिलचं शानदार शतक
न्यूझीलंडचा फलंदाज मार्टिन गप्टिलने इंग्लंडमधील ट्वेन्टी ट्वेन्टी ब्लास्ट लीग स्पर्धेत अवघ्या 35 चेंडूंमध्ये शतक ठोकलं.

लंडन : न्यूझीलंड क्रिकेट संघाचा धडाकेबाज फलंदाज मार्टिन गप्टिलने इंग्लंडमधील ट्वेन्टी ट्वेन्टी ब्लास्ट लीग स्पर्धेत धमाका केला आहे. अवघ्या 35 चेंडूंमध्ये गप्टिलने शानदार शतक ठोकलं. वूस्टरशायर संघाकडून खेळताना मार्टिन गप्टिलने ही कामगिरी केली. गप्टिलनं या सामन्यात 38 चेंडूंमध्ये 102 धावांची खेळी साकारली. त्यात 12 चौकार आणि 7 षटकारांचा समावेश होता. गप्टिलच्या खेळीमुळे वूस्टरशायर संघाला नॉर्दम्प्टनशायर संघावर 9 विकेट्सनी विजय मिळवता आला. वूस्टरशायरसमोर या सामन्यात 188 धावांचं मोठं लक्ष्य होतं. टी ट्वेन्टी क्रिकेटच्या इतिहासात वेगवान शतक झळकावणाऱ्यांच्या यादीत गप्टिल संयुक्तपणे चौथ्या स्थानावर आहे. याआधी भारताचा रोहित शर्मा, दक्षिण आफ्रिकेचा डेव्हिड मिलर आणि नामिबियाच्या वेस्थुझेननं 35 चेंडूत शतक ठोकलं होतं. ट्वेटी ट्वेन्टीत वेगवान शतक झळकावण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर जमा आहे. गेलने आयपीएलमध्ये 30 चेंडूंत शतक ठोकण्याची कामगिरी केली होती. भारताचा ऋषभ पंत (32 चेंडू) दुसऱ्या, तर ऑस्ट्रेलियाचा अँड्र्यू सायमंड्स (34) तिसऱ्या स्थानावर आहे
आणखी वाचा























