एक्स्प्लोर
दिग्गजांचा विक्रम मोडीत, आफ्रिकेविरुद्ध गप्टीलची वादळी खेळी
हॅमिल्टन : न्यूझीलंडचा सलामीवीर फलंदाज मार्टिन गप्टिलने 138 चेंडूंत केलेल्या नाबाद 180 धावांच्या खेळीने न्यूझीलंडला हॅमिल्टनच्या चौथ्या वन डेत 30 चेंडू आणि सात विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवून दिला.
न्यूझीलंडने या विजयासह पाच वन डे सामन्यांच्या मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली. न्यूझीलंडच्या या विजयाचा प्रमुख शिल्पकार मार्टिन गप्टिलच ठरला. यासोबतच गप्टील वन डे सामन्यात तीन वेळा 180 धावा करणारा पहिलाच फलंदाज ठरला आहे.
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने 50 षटकांत आठ बाद 279 धावांची मजल मारली होती. पण मार्टिन गप्टिल आणि रॉस टेलर या अनुभवी फलंदाजांनी तिसऱ्या विकेटसाठी 180 धावांची भागीदारी रचून, न्यूझीलंडला 280 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग सोपा करून दिला.
गप्टिलने नाबाद 180 धावांच्या खेळीला 15 चौकार आणि 11 षटकारांचा साज चढवला. रॉस टेलरने सात चौकार आणि एका षटकारासह 66 धावांची खेळी केली. या सामन्यातल्या सर्वोत्तम खेळाडूचा मान हा मार्टिन गप्टिललाच देण्यात आला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement