एक्स्प्लोर
मनीष पांडेने घेतलेला झेल पाहून प्रेक्षकही स्तब्ध!
मनीष पांडेने हँड्सकॉम्बचा घेतलेला झेल पाहून मैदानातील सर्व प्रेक्षकही आश्चर्यचकित झाले.

इंदूर : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेत मनीष पांडेच्या बॅटने तर अजून कमाल दाखवलेली नाही. मात्र त्याने तिसऱ्या वन डेत ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण केलं त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली. मनीष पांडेने हँड्सकॉम्बचा घेतलेला झेल पाहून मैदानातील सर्व प्रेक्षकही आश्चर्यचकित झाले. हा झेल पाहण्यासाठी उपस्थित असलेले सर्व प्रेक्षक जागेवर उठून उभे राहिले. जसप्रीत बुमराच्या षटकात हँड्सकॉम्ब फलंदाजी करत होता. त्याने मारलेला शॉट सीमारेषेच्या बाहेर जाणार होता. मात्र मनीष पांडेने अगोदर चेंडू अडवून तो बाहेर फेकला आणि पुन्हा झेल घेतला. पाहा व्हिडिओ : https://twitter.com/Cricvids1/status/911921883662082050
Before You Go
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सचा घरच्या मैदानावर पराभव करत विजयीरथ रोखला






















