(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL 2024 Mallika Sagar : आयपीएलमध्ये इतिहास घडणार, दुबई लिलावात पहिल्यांदाच महिलेचा आवाज दुमदुमणार! मल्लिका सागर आहे तरी कोण?
IPL 2024 Mallika Sagar : क्रिकेट व्यतिरिक्त मल्लिकाने प्रो कबड्डी लीग 2021 च्या लिलावात खेळाडूंवर देखील बोली लावली आहे. अशा स्थितीत मल्लिकाला याचा खूप अनुभव आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
IPL 2024 Mallika Sagar : IPL 2024 च्या लिलावासाठी अवघे काही तास उरले आहेत. उद्या 19 डिसेंबर रोजी दुबईतील कोका-कोला परिसरात 333 खेळाडूंवर बोली लावली जाणार आहे. जेव्हाही तुम्ही आयपीएल लिलावाबद्दल विचार करता तेव्हा सहसा लोकांच्या मनात ह्यूज अॅडमीड्स यांचा चेहरा येतो. जे अनेक वर्षांपासून आयपीएलमधील खेळाडूंवर बोली लावत आहेत. मात्र, यावेळी पहिल्यांदाच आयपीएल लिलावात भारतीय महिलेचा आवाज दुमदुमणार आहे. मल्लिका सागर दुबई लिलावात बोली लावणार आहेत.
कोण आहे मल्लिका सागर?
आयपीएल 2024 मध्ये मल्लिका सागर बोली लावतील. मल्लिका सागर ही मुंबईची रहिवासी असून तिने यापूर्वीही हे काम केले आहे. मल्लिकाने याआधीही हे काम चांगले केले आहे.मल्लिकाने महिला प्रीमियर लीग 2023 म्हणजेच WPL च्या पहिल्या सत्रात सर्व खेळाडूंचा यशस्वी लिलाव केला होता. महिला प्रीमियर लीगमधील लिलावाची तिची वेगळी शैलीही लोकांना आवडली. परिणामी, मल्लिकाने महिला आयपीएलच्या दुसऱ्या सत्राचा लिलावही केला.
Mallika Sagar will conduct the IPL 2024 auction in Dubai. [Cricbuzz] pic.twitter.com/rw1moczOQc
— Johns. (@CricCrazyJohns) December 17, 2023
क्रिकेट व्यतिरिक्त मल्लिकाने प्रो कबड्डी लीग 2021 च्या लिलावात खेळाडूंवर देखील बोली लावली आहे. अशा स्थितीत मल्लिकाला याचा खूप अनुभव आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आजपर्यंत लिलाव कोणी केले?
आयपीएल 2008 मध्ये सुरू झाले आणि आतापर्यंत एकूण 16 हंगाम खेळले गेले आहेत, परिणामी लिलाव 16 वेळा आयोजित केले गेले आहेत. आतापर्यंत फक्त 2 लिलाव झाले आहेत ज्यात पुरुषांच्या आयपीएलमध्ये लोकांनी बोली लावली आहे. पहिला रिचर्ड मेडेली आणि दुसरे फिलिप अॅडमीड्स . रिचर्ड हॅडली यांनी 2008 ते 2018 या कालावधीत लिलावात खेळाडूंवर बोली लावली. त्याच वेळी, 2019 पासून आतापर्यंत फक्त अॅडमीड्स बोली लावत आहे. आयपीएल 2024 च्या मेगा लिलावादरम्यान त्यांची तब्येत बिघडली, त्यानंतर चारू शर्माने त्या दिवशी लिलाव पुढे नेला. दुसऱ्या दिवशी अॅडमीड्स लिलाव करण्यासाठी परत आले.
IPL 2024 auction details:
— Johns. (@CricCrazyJohns) December 18, 2023
Date - 19th December
Time - 1 pm IST
TV - Star Sports
Streaming - JioCinema. pic.twitter.com/Pm1aWo2HaR
या मिनी लिलावात केवळ भारतीय खेळाडूच नाही तर परदेशी सुपरस्टार्सवरही करोडो रुपयांचा वर्षाव होणार आहे. या लिलावासाठी एकूण 333 परदेशी खेळाडूंनी आपली नावे नोंदवली आहेत. यात ट्रॅव्हिस हेड, रचिन रवींद्र, मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, डॅरिल मिशेल, हॅरी ब्रूक, आदिल रशीद, डेव्हिड मलान आणि टॉम कुरन, ख्रिस जॉर्डन, बेन डकेट, फिलिप सॉल्ट, टॉम बॅंटन आणि सॅम यांसारखे अनेक परदेशी सुपरस्टार्स आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या