एक्स्प्लोर
बांग्लादेशचा डाव गुंडाळला, भारताला 299 धावांची भक्कम आघाडी

हैदराबाद : भारत विरुद्ध बांग्लादेश सुरु असलेल्या कसोटी सामन्याचा आजच्या चौथ्या दिवशी बांग्लादेशचा डाव 388 धावांवर गुंडाळला. आजचा खेळ सुरु झाल्यावर कर्णधार मुश्फिकर रहीमनं आपली एकाकी झुंज सुरु ठेवत कसोटी कारकिर्दीतलं पाचवं शतक झळकावलं. रहीमनं 262 चेंडूत 127 धावा झळकावल्या. सध्या बांग्लादेशावर भारतानं 299 धावांची भक्कम आघाडी मिळवली आहे. हैदराबादच्या राजीव गांधी क्रिकेट स्टेडिअमवर सुरु असलेल्या सामन्यात बांगलादेशनं आजच्या दिवसाची सुरुवात सहा गडी बाद 322 वरुन पुढे खेळण्यास सुरुवात केली. यानंतर भुवनेश्वर कुमारनं बांग्लादेशला पहिला झटका देत नाबाद 51 धावांवर खेळत असलेल्या मेहदी हसन याचा त्रिफळा उडवला. हसनने रहीमच्या साथीनं सातव्या विकेटसाठी 87 धावांची भागीदारी रचली. यानंतर खेळायला मैदानात उतरलेल्या तैजुल इस्लामला उमेश यादवनं रिद्धीमान सहाकडून 10 धावांवर झेलबाद करुन तंबूत पाठवलं. तर रवींद्र जडेजानंही तास्किन अहमदला रिद्धीमान सहाकडं झेलबाद करुन 8 धावा पुन्हा तबूंत पाठवलं. रविचंद्रन अश्विनने शेवटची विकेट घेत 127 धावांवर रहीमला रिद्धीमान सहाकडून झेलबाद केलं. त्याच्या या विकेटनं अश्विननं आपला कसोटी कारकीर्दीतील 250 बळी घेण्याचा आकडा पार केला.
आणखी वाचा























