एक्स्प्लोर
लायनल मेस्सीवर चार सामन्यांसाठी बंदी
ब्यूनस आयर्स : अर्जेंटीना फुटबॉल टीमचा कर्णधार आणि स्टार स्ट्रायकर लायनल मेस्सीवर फिफाने चार सामने खेळण्यावर बंदी घातली आहे. मेस्सीवरील ही कारवाई 2018 च्या विश्वचषकासाठी सुरु असलेल्या पात्रता फेरी सामन्यातील रेफरींशी गैरवर्तुणूक केल्याप्रकरणी करण्यात आली आहे.
सध्या 2018 च्या फुटबॉल विश्वचषकासाठी पात्रता फेरीतील सामने सुरु आहेत. यातीलच अर्जेंटीना आणि चिली यांच्या दरम्यान 23 मार्च 2017 रोजी सामना झाला. या सामन्या दरम्यान मेस्सीने सहाय्यक रेफरींसोबत गैरवर्तुणूक करत, अपशब्दांचा वापर केला. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन फिफा अनुशासन समितीने मेस्सीवर चार सामन्यांची बंदी घातली. तसेच त्याला 10 हजार स्विस फ्रँक म्हणजे 6 लाख 50 हजाराचा दंड ही ठोठावला आहे.
सध्या फिफा विश्वचषक सामन्यांच्या पात्रता फेरीतील सामन्यांच्या गुणतालिकेत अर्जेंटीनाचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे मेस्सीच्या चार सामन्यात बाहेर राहण्याने 2018 मध्ये रशियात होणाऱ्या फिफा विश्वचषकासाठी अर्जेंटीना संघासमोर आपले स्थान बळकट करण्याचे आव्हान आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement