एक्स्प्लोर
Advertisement
लायनेल मेसी... फुटबॉलच्या दुनियेचा नायक!
लायनेल मेसी हा येत्या रविवारी एकतीस वर्षांचा होत आहे. त्याचा अर्थ रशियातला फिफा विश्वचषक हा त्याच्या कारकीर्दीतला अखेरचा विश्वचषक आहे. त्यामुळं यंदा नाही, तर मेसीला विश्वचषक जिंकण्याची पुन्हा संधी कधीच मिळणार नाही.
लायनेल मेसी... फुटबॉलच्या दुनियेचा आजच्या जमान्याचा एक नायक. अर्जेंटिनाचा महानायक दियागो मॅराडोनाचा वारसदार अशीही त्याची ओळख आहे. पण मॅराडोनाला जे जमलं, ते मेसीसाठी अजूनही स्वप्नच आहे. सलग तीन विश्वचषकांत खेळूनही, मेसीला त्या विश्वचषकावर अर्जेंटिनाचं नाव कोरता आलेलं नाही. यंदा चौथ्या आणि अखेरच्या प्रयत्नात मेसी अर्जेंटिनाला विश्वचषक जिंकून देईल का? या सर्व गोष्टींचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट...
लायनेल मेसी हा येत्या रविवारी एकतीस वर्षांचा होत आहे. त्याचा अर्थ रशियातला फिफा विश्वचषक हा त्याच्या कारकीर्दीतला अखेरचा विश्वचषक आहे. त्यामुळं यंदा नाही, तर मेसीला विश्वचषक जिंकण्याची पुन्हा संधी कधीच मिळणार नाही.
फिफाचा विश्वचषक जिंकणं प्रत्येक आंतरराष्ट्रीय फुटबॉलवीराचं स्वप्न असतं. अर्जेंटिनाचा लायनेल मेसीही त्याला अपवाद नाही. पण लागोपाठ चौथ्या विश्वचषकात खेळत असलेल्या मेसीला आजवर आपलं ते स्वप्न साकार करता आलेलं नाही. पण तोच मेसी स्पेनमधल्या त्याच्या क्लबकडून म्हणजे एफसी बार्सिलोनाकडून खेळतो, त्या वेळी यश त्याच्यावर फिदा असतं.
लायनेल मेसीनं आजवरच्या कारकीर्दीत एफसी बार्सिलोनाकडून खेळताना चॅम्पियन्स लीगच्या विजेतेपदावर चारवेळा आणि ला लिगाच्या विजेतेपदावर नऊवेळा नाव कोरलं आहे. त्याच मेसीला अर्जेंटिनाकडून खेळताना एकही प्रतिष्ठेचं विजेतेपद पटकावता आलेलं नाही. मारियो केम्पसच्या अर्जेंटिनानं १९७८ साली, तर दियागो मॅराडोनाच्या अर्जेंटिनानं १९८६ साली फिफा विश्वचषकावर आपलं नाव कोरलं होतं. त्या दोघांच्या तुलनेत अधिक लोकप्रियता लाभलेल्या मेसीला विश्वचषक काही जिंकता आलेला नाही.
२००६ आणि २०१० सालच्या विश्वचषकात अर्जेंटिनाचं आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आलं होतं. त्यानंतर २०१४ सालच्या विश्वचषकात अर्जेंटिनाला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. कोपा अमेरिकातही अर्जेंटिनाला गेल्या पंचवीस वर्षांत चार उपविजेतीपदांपलीकडं मजल मारता आलेली नाही. त्यापैकी २००७, २०१५ आणि २०१६ साली मेसीला कोपा अमेरिकाच्या उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं.
रशियातल्या फिफा विश्वचषकातही त्याच मेसीकडे सारी अर्जेंटिना आणि जगभरातले चाहते मोठ्या अपेक्षेनं पाहत होते. पण पहिल्याच सामन्यात मेसी आणि त्याच्या अर्जेंटिनानं त्यांचा अपेक्षाभंग केला. या सामन्यात आईसलँडनं अर्जेंटिनाला १-१ असं बरोबरीत रोखलं. पण अर्जेंटिनाचं मोठं दुर्दैव म्हणजे सलामीच्या सामन्यात मेसी नावाची जादू चालली नाही. आईसलँडचा गोलरक्षक हालडॉरसननं मेसीची पेनल्टी अगदी लिलया थोपवली.
आईसलँडविरुद्धच्या त्या बरोबरीनंतर आता विश्वचषकाची बाद फेरी गाठायची तर अर्जेंटिनाला गुरुवारी क्रोएशियाचं आव्हान उधळून लावावं लागणार आहे. क्रोएशियानं सलामीच्या सामन्यात नायजेरियाचा २-० असा धुव्वा उडवला होता. त्यामुळं ड गटात तीन गुणांसह क्रोएशिया अव्वल स्थानावर आहे. या पार्श्वभूमीवर क्रोएशियाविरुद्धच्या सामन्यासाठी मेसीला ख्रिस्तियन पावोनची साथ लाभण्याची चिन्हं आहेत. पावोन हा तुलनेत चपळ आहे. तसंच तो डावीकडून किंवा उजवीकडूनही आक्रमण करू शकतो. पण पावोनला खेळवायचं तर त्यासाठी एंजल डी मारियासारख्या अनुभवी शिलेदाराला विश्रांती देण्याचा धाडसी निर्णय अर्जेंटिना घ्यावा लागेल. पण त्यानंतरही अर्जेंटिनाची मदार ही लायनेल मेसीवरच राहिल. कारण सारं जग मेसीकडे मॅराडोनाचा वारसदार म्हणून पाहतं. आणि जसा मॅराडोनानं अर्जेंटिनाला विश्वचषक जिंकून दिला, तसा मेसीही अर्जेंटिनाला विश्वचषक जिंकून देईल, असा त्यांना विश्वास आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement