नवी दिल्ली : सिनेचाहत्यांना एकापाठोपाठ दोन धक्के मिळाले असून इरफान खान आणि ऋषी कपूर यांसारख्या दोन अप्रतिम कलाकारांना चाहत्यांनी गमावलं आहे. आता क्रिडाचाहत्यांना धक्का मिळाला आहे. भारताचे महान फुटबॉलर चुन्नी गोस्वामी यांचं निधन झालं असून ते 82 वर्षांचे होते. चुन्नी गोस्वामी यांचं निधन हृदयविकाराच्या झटक्याने झालं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चुन्नी गोस्वामी यांनी कोलकत्ता येथील रूग्णालयात शेवटचा श्वास घेतला.


चुन्नी गोस्वामी यांच्या शेवटच्या काळात त्यांचं संपूर्ण कुटुंब त्यांच्यासोबत होतं. चुन्नी गोस्वामी यांची पत्नी आणि मुलगा सुदिप्तो रूग्णालयात उपस्थित होते. दरम्यान, चुन्नी गोस्वामी 1962 मध्ये आशियाई खेळांमध्ये सुवर्ण पदक जिंकणाऱ्या फुटबॉल संघाचे कर्णधार होते. चुन्नी गोस्वामी यांना उत्कृष्ट क्रिकेटर म्हणूनही ओळखलं जात होतं. त्यांनी बंगालच्या संघासाठी फर्स्ट क्लास क्रिकेटही खेळले होतं.



चुन्नी यांच्या निधनानंतर त्यांचे कुटुंबिय म्हणाले की, 'चुन्नी यांना हृदयविकाराचा झटका आल्याने रूग्णालयात जवळपास 5 वाजता त्यांचं निधन झालं.' कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, चुन्नी गोस्वामी यांना मधुमेह, प्रोस्ट्रेट आणि नर्व सिस्टमशी संबंधित आजारांनी ग्रासले होते.


गोस्वामी यांनी भारतासाठी फुटबॉलर म्हणून 1956 ते 1964 पर्यंत जवळपास 50 सामने खेळले होते. तर क्रिकेटर म्हणून त्यांनी वर्ष 1962 आणि 1973 मध्ये 46 पहिल्या श्रेणीतील सामन्यांमध्ये बंगालचं प्रतिनिधित्व केलं होतं. दरम्यान, बीसीसीआयने ट्वीट करत चुन्नी गोस्वामी यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.


संबंधित बातम्या : 


Olympic 2020 | ... तर ऑलिम्पिक रद्द होणार; टोकियो ऑलिम्पिक कमिटीचा इशारा


Coronavirus | IPL 2020 रद्द झाल्यास मोठं नुकसान, पाच मोठे फटके कोणते?


Wimbledon | यंदा विम्बल्डनचं आयोजन नाही, दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच स्पर्धा रद्द