यंदा विम्बल्डन स्पर्धा रद्द होणार हे आधीच निश्चित झालं होतं. पण 134व्या विम्बल्डन स्पर्धेचं आयोजन पुढील वर्षी 28 जून ते 11 जुलै दरम्यान होईल, हे आता ठरवण्यात आलं आहे.
Coronavirus | आयपीएलचा तेरावा सीझन लांबणीवर, 15 एप्रिलपासून सुरुवात होणार
ही स्पर्धा 29 जून ते 12 जुलैदरम्यान खेळवली जाणार होती. विम्बल्डन बोर्डाची बुधवारी (1 एप्रिल) बैठक झाली, त्यात यंदा ग्रॅण्डस्लॅमचं आयोजन न करण्याचा निर्णय घेण्यात आला. "सध्याच्या वातावरणात विम्बल्डन स्पर्धेचं आयोजन करणं शक्य नाही," असं बोर्डाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.
याआधी फ्रेन्च ओपन स्पर्धेचं आयोजन सप्टेंबर महिन्यापर्यंत टाळण्यात आलं आहे. फ्रेन्च ओपन स्पर्धा दरवर्षी मे महिन्यात खेळवली जाते.
Olympic 2020 | टोकियो ऑलिम्पिकच्या नव्या तारखा जाहीर
इतर खेळांवरही कोरोनाचा परिणाम
- कोरोना व्हायरसमुळे टोकियोमध्ये होणारी ऑलिम्पिक स्पर्धा एक वर्षासाठी लांबणीवर पडली आहे. टोकियो ऑलिम्पिकचं आयोजन आता पुढील वर्षी म्हणजेच 2021 मध्ये जुलै ते ऑगस्ट दरम्यान होणार आहे.
- यंदा वर्षअखेरीस होणाऱ्या ट्वेण्टी-20 क्रिकेट विश्वचषकावरही कोरोनो व्हायरसचं सावट आहे.
- कोरोना व्हायरसमुळेच इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलचा तेरावा सीझन जवळपास रद्द झाला आहे