मुंबई : जगभरातील 212 देशांमध्ये कोरोनाचा कहर सुरुच आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार जीवघेण्या कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत जगभरात 2 लाख 34 हजार  075  लोकांचा मृत्यू झाला आहे.  कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्यांची संख्या 33 लाख 7 हजारांवर पोहोचली आहे. जगभरात 10 लाख 39 रुग्ण बरे झाले आहेत.  मागील 24 तासात 85960 नवीन कोरोनाबाधितांची भर पडली आहे तर 5800 जणांचा मृत्यू झाला आहे.


जगात  कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. जगात जवळपास एक तृतीयांश मृत्यू एकट्या अमेरिकेत झाले आहेत. अमेरिकेत 1095023 जणांना कोरोनाचा संसर्ग झालाय.  तर 63856 लोकांचा मृत्यू कोरोनामुळं झालाय. अमेरिकेनंतर स्पेनमध्ये कोविड-19मुळं 24543 लोकांचा मृत्यू झालाय. 239639 लोकांना स्पेनमध्ये कोरोनाची लागण झाली. कोरोनाच्या मृत्यूंच्या आकड्यात इटली दुसऱ्या क्रमांकावर आहे. इटलीत आतापर्यंत 27,967  मृत्यू झाले आहेत. तर कोरोनाबाधितांचा आकडा 205463  इतका आहे.

Coronavirus | कोरोनाचा खात्मा होण्यासाठी अजून खूप वेळ, संसर्ग वाढणं चिंतेची बाब : WHO

जगातील अमेरिका, स्पेन, इटली, फ्रांस, ब्रिटन हे पाच देश असे आहेत जिथं कोरोनामुळे 20 हजाराहून अधिक बळी गेले आहेत. एकट्या अमेरिकेत कोरोनाचे 60 हजारांहून अधिक बळी गेले आहेत.

विविध देशांमध्ये कोरोनाबाधित आणि त्यामुळं झालेल्या मृत्यूंची आकडेवारी