एक्स्प्लोर
कॅप्टन कोहलीकडून केदार आणि हार्दिकचं कौतुक!
![कॅप्टन कोहलीकडून केदार आणि हार्दिकचं कौतुक! Kohli Appreciate To Kedar Jadhav And Hardik कॅप्टन कोहलीकडून केदार आणि हार्दिकचं कौतुक!](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/01/23164317/Virat-Kohli-Kedar-Jadhav1-580x3951.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
कोलकाता: इंग्लंडविरुद्धच्या वन डे सामन्यांच्या मालिकेत पाहायला मिळालेला केदार जाधवचा नवा अवतार आणि हार्दिक पंड्यानं बजावलेली कामगिरी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीच्या निमित्तानं आशादायी चित्र निर्माण करत असल्याचे उद्गार कर्णधार विराट कोहलीनं काढले आहेत.
कोलकात्याच्या तिसऱ्या वन डेत केदार जाधवला भारताला विजय मिळवून देऊ शकला नाही, पण तीन सामन्यांमध्ये त्यानं 232 धावा फटकावून त्यानं मालिकावीराच्या पुरस्कारावर आपलं नाव कोरलं.
केदार जाधवनं सहाव्या क्रमांकावर फलंदाजीची जबाबदारी स्वीकारली असल्याचं त्याच्या या कामगिरीतून दिसून येत आहे. कोलकात्याच्या वन डेत पाच बाद 174 या परिस्थितीत, केदार जाधव आणि हार्दिक पंड्या यांनी केलेल्या 104 धावांच्या भागिदारीचंही विराट कोहलीनं कौतुक केलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
करमणूक
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)