Lakshya Sen Rewarded: थॉमस चषक (Thomas Cup 2022) जिंकणाऱ्या भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाचा सदस्य लक्ष्य सेनला कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी सोमवारी राज्य सरकारकडून 5 लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केलं. मुख्यमंत्र्यांनी युवा सक्षमीकरण आणि क्रीडा विभागातर्फे आयोजित 'मिनी-ऑलिम्पिक स्पोर्ट्स मीट-2022' चे उद्घाटन केल्यानंतर ही घोषणा केली. आपले सरकार सर्व खेळांना प्रोत्साहन देत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.


बोम्मई म्हणाले की, " 2024 मध्ये पॅरिस ऑलिम्पिकची स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेच्या तयारीचा भाग म्हणून आम्ही विविध खेळांतील 75 खेळाडूंच्या गटाची विशेष प्रशिक्षणासाठी निवड केली आहे. थॉमस चषकाच्या अंतिम सामन्यात भारतानं 14 वेळा चॅम्पियन ठरलेल्या इंडोनेशियाला 3-0 च्या फरकानं पराभूत करून थॉमस चषकावर पहिल्यांदाच नाव कोरलं.


एएनआयचं ट्वीट- 



73 वर्षानंतर भारतानं थॉमस चषक जिंकला
आतापर्यंत इंडोनेशियानं सर्वाधिक 14 वेळा, चीननं 10 वेळा, मलेशियानं 5 वेळा तर, जपान आणि डेन्मार्क यांनी एक-एक वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. ज्यानंतर यंदा 2022 साली भारताने या स्पर्धेत चॅम्पियन इंडोनेशियाला मात देत इतिहास घडवला आहे. त्यामुळे ही स्पर्धा जिंकणारा भारत जगातील सहावा देश बनला आहे. या स्पर्धेत भारतीय बॅडमिंटन संघानं सुरुवातीपासून उत्कृष्ट कामगिरी केली. त्यांनी आधी डेन्मार्कला सेमीफायनलमध्ये मात दिल्यानंतर अंतिम सामन्यात इंडोनेशियाला सुरुवातीच्या तीन सामन्यात मात दिली.


भारताच्या विजयाच्या शिल्पकार
या स्पर्धेतील पहिला सामना पुरुष एकेरीत लक्ष्य सेननं जिंकला. त्याने इंडोनेशियाच्या अँथॉनी गिंटिंगचा 8-21, 21-17 आणि 21-16 असा पराभव केला. त्यानंतर पुरुष दुहेरी सामन्यात भारतीय बॅडमिंटनपटू जोडी सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टीने इंडोनेशियाच्या मुहम्मद एहसान आणि केविन संजया यांना 18-21, 23-21, 21-19, अशा फरकानं मात दिली. ज्यानंतर तिसऱ्या सामन्यात किंदम्बी श्रीकांतनं (kidambi srikanth) इंडोनेशियाच्या जोनाथन क्रिस्टीला 21-15, 22-21 च्या फरकानं मात देऊन चषकावर नाव कोरलं.


हे देखील वाचा-