Thomas Cup 2022 : भारतानं रचला इतिहास, इंडोनेशियाला मात देत जिंकला थॉमस कप
तब्बल 73 वर्षानंतर थॉमस कपच्या (Thomas Cup) अंतिम सामन्यात पोहोचलेल्या भारताने इंडोनेशियाला मात देत चषकावर नाव कोरलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतब्बल 74 वर्षांनंतर प्रथमच थॉमस कपमध्ये अंतिम सामना खेळणं ही भारतासाठी फार मोठी गोष्ट होती. सेमीफायनलमध्ये डेन्मार्क संघाला नमवत भारताच्या पुरुष बॅडमिंटन संघाने अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. ज्यानंतर आता पहिले तीन सामने जिंकत कपही खिशात घातला आहे.
यावेळी भारतीय बॅडमिंटन संघातील सर्वच खेळाडूंनी दमदार कामगिरी करत संघाला विजय मिळवून दिला.
सर्वात आधी पुरुष एकेरीत लक्ष्य सेनने सामना जिंकला. लक्ष्यने इंडोनेशियन खेळाडू अँथनी सिनिसुका गिंटिंगचा 8-21, 21-17 आणि 21-16 असा पराभव केला.
नंतर दुसऱ्या पुरुष दुहेरी सामन्यात भारतीय बॅडमिंटनपटू जोडी सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टीने विजय मिळवला.
त्यानंतर दुसऱ्या पुरुष एकेरी सामन्यात किंदम्बी श्रीकांतने (kidambi srikanth) जोनाथन क्रिस्टीला (Jonatan Christie) मात देत सामना तर जिंकलाच पण सोबतच भारताला 5 पैकी 3 सामने जिंकवून देत कपही जिंकवून दिला आहे.
या विजयानंतर सर्वच स्तरातून भारतीय बॅडमिंटन संघावर कौतुकाचा वर्षाव होत अनेक मान्यवरांनी ट्वीट करत शुभेच्छा दिल्या आहेत.
आतापर्यंत सर्वाधिक 14 वेळा इंडोनेशियाने, 10 वेळा चीनने, मलेशियाने 5 वेळा तर जपान आणि डेन्मार्क यांनी एक-एक वेळा ही स्पर्धा जिंकली आहे.
ज्यानंतर यंदा 2022 साली भारताने या स्पर्धेत चॅम्पियन इंडोनेशियाला मात देत पहिलं वहिला चषक मिळवला आहे.
त्यामुळे ही स्पर्धा जिंकणार भारत जगातील सहावा देश बनला आहे.