Chennai Super Kings vs Mumbai Indians : आयपीएल 2025 मध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाने मुंबई इंडियन्स संघाचा 4 विकेट्सने पराभव करत या हंगामाची धमाकेदार सुरुवात केली. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबईने 156 धावांचे लक्ष्य ठेवले, जे सीएसकेने सहज पार केले. महेंद्रसिंग धोनी पण या सामन्यात फलंदाजीसाठी आला होता, त्यावेळी स्टेडियममध्ये उपस्थित असलेले सर्व क्रिकेट चाहते उत्साहित दिसत होते.
मुंबई इंडियन्स विरुद्ध महेंद्रसिंग धोनीने दोन चेंडू खेळले पण एकही धाव काढता आली नाही. सामना संपल्यानंतर चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्सचे खेळाडू एकमेकांशी हस्तांदोलन करत होते.त्यावेळी धोनीने मजेदार पद्धतीने दीपकला बॅटने मारले. यावर तो हसताना दिसला. आता त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
चेन्नई सुपर किंग्जमध्ये असताना दीपक चहर एमएस धोनीकडून खूप काही शिकला आहे. पण आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात सीएसके त्याला पुन्हा खरेदी करण्यात अपयशी ठरली. अखेर त्याला मुंबई इंडियन्सने 9.75 कोटी रुपयांना खरेदी केले. चेन्नई आणि मुंबई सामना खेळला तेव्हा दीपक चहर त्याच्याच जुन्या संघाविरुद्ध खेळताना दिसला. जरी सीएसकेने सामना 4 विकेट्सने जिंकला असला तरी, दीपक चहरने बॅट आणि बॉल दोन्हीमध्ये खूप चांगली कामगिरी केली. दरम्यान, दीपकची बहीण मालती चाहरने तिच्या भावाला 'कटप्पा' म्हटले आहे.
आयपीएल कारकिर्दीची शेवटची सात वर्षे सीएसकेसोबत खेळणाऱ्या चहरने एमआयसाठी केवळ एक विकेट घेतली नाही तर 15 चेंडूत नाबाद 28 धावाही केल्या. यादरम्यान चहरची बहीण मालतीने सोशल मीडियावर एक मजेदार मीम शेअर केले आहे. मालती तिच्या भावाला त्याच्या जुन्या संघाविरुद्ध खेळल्याबद्दल ट्रोल करते. त्याने या परिस्थितीची तुलना तेलुगू चित्रपट बाहुबलीशी केली, ज्यामध्ये हिरोवर त्याचा कटप्पा मामाने मागून चाकूने वार केले. म्हणजे सीएसकेकडून खेळलेल्या चहरने धोनीच्या चेन्नईला धोका दिला. त्याचे फोटो आणि व्हिडिओही व्हायरल झाले.
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने 155 धावा केल्या. जर दीपक चहर नसता तर एमआयचा संघ 130-135 पर्यंत मर्यादित राहिला असता. दीपकने शेवटच्या षटकांमध्ये 15 चेंडूत 28 धावांची अत्यंत महत्त्वाची खेळी खेळली आणि एमआयला 155 पर्यंत पोहोचवले. प्रत्युत्तरादाखल, चेन्नई सुपर किंग्जला हे लक्ष्य गाठण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला, परंतु ऋतुराज गायकवाडच्या 53 धावा आणि रचिन रवींद्रच्या 65 धावांच्या खेळीमुळे चेन्नईने 4 विकेट्सने विजय मिळवला.